Satara News: मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर पुन्हा एकदा दरोडा पडला आहे. गेल्या वर्षभरात दरोडेखोरांनी ही महालक्ष्मी एक्सप्रेस लुटण्याची ही तिसरी घटना आहे. यावेळी दरोडेखोरांनी चक्क सिग्नल यंत्रणाच बिघडवत ही एक्सप्रेस लुटल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यानचा कायदा सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकाच वर्षांत तिसऱ्यांदा लुटमारीची घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा लुटमारीच्या घटनेचा रविवारी मध्यरात्री थरार घडला. दरोडेखोरांनी पुणे-मिरज रेल्वे मार्गावर सालपे रेल्वेस्थानकानजीक सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रविवारी (ता.1 नोव्हेंबर) मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर आठ ते दहा चोरट्यांच्या टोळीने लूटमार केली.
मिळालेल्या माहितीनुसार,महालक्ष्मी एक्सप्रेसमधील तीन महिला प्रवाशांच्या गळ्यातील ६० ते ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाल्याचं समोर येत आहे. तसेच पळून जाताना या चोरट्यांनी रेल्वेच्या तीन ते चार डब्यांवर दगडफेकही केल्याने रेल्वे प्रवाशांच्यात एकच खळबळ उडाली असून,रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेसमधील लुटमारीची घटनेची मिरज रेल्वे पोलिसांकडे या घटनेची नोंद झाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पुणे- मिरज मार्गावरून मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस मध्यरात्री लोणंद रेल्वेस्थानकावर थांबून पुढे साताऱ्याकडे जात असताना तांबवे व सालपे रेल्वे स्थानकांच्यामध्ये असणाऱ्या सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वेगाडी थांबवली. त्यानंतर आठ ते दहा चोरट्यांनी रेल्वे गाडीतील महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खिडकीतून हात घालून हिसकावून लूट केल्याचा प्रकार घडला आहे.
रेल्वेच्या एस- थ्री डब्यातील सीट नंबर ४१, ४२, ४३, तसेच एस- वन डब्यातील सीट नंबर ४९ वरील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चेन आदी ५२ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज या चोरट्यांनी हिसकावून नेला आहे. हे चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले
या दरोडेखोरांनी पळून जाताना महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एस-२, एस-३ आणि एस-५ या तीन ते चार डब्यांवर जोरदार दगडफेकही केल्याचं समोर येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे या मार्गावरील महालक्ष्मी एक्स्प्रेससह, हुबळी एक्स्प्रेस, कोल्हापूर- पुणे आदी तीन रेल्वेगाड्या काहीशा विलंबाने धावल्या. मिरज लोहमार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.