Karad News, 08 Jan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दारून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची सल अजूनही आघाडीतील नेत्यांच्या मनामध्ये आहे. शिवाय या निवडणुकीत आघाडीतील नेत्यांच्या वादामुळे आणि अंतर्गत कलहामुळेच मविआची वाताहत झाल्याचं बोललं जात आहे.
अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा निवडणुकीत आघाडीचा पराभव कशामुळे झाला याचं कारण सांगितलं आहे. कराडमध्ये माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमातात बोलताना त्यांनी 'जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधीपक्षांचा जागोजागी पराभव झाला' असं म्हणत मविआच्या नेत्यांना सुनावलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, "कराड दक्षिण आणि उत्तरच्या विधानसभा निवडणुकी वेळी ज्या पद्धतीने राजकारण घडलं ते चांगलं नव्हतं. एकमेकांच्या जिरवा जिरवीतून आपण आपले पक्ष मागे खेचल्याचं भान ठेवावं. आतातरी कार्यकर्त्यांनी शहाणपणाने वागावं, मैदानात उतरताना फार शत्रू झाल्याने आपल्याला पुढे जायला अडचण होते, दुसऱ्याला खेचण्यापेक्षा आपण पुढे जाण्याचा विचार ठेवून समझोता करायचा असतो.
आता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता थांबा आणि मला कधीतरी खासगीत बोलवा, मग मी आपली शिकवणी घेतो, असं म्हणत पाटील यांनी उदयसिंह पाटील आणि कराड उत्तरचे पराभूत आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना कानपिचक्या दिल्या. शिवाय यवेळी त्यांनी विलासकाका उंडाळकर यांनी काँग्रेसची विचारसरणी कधी सोडली नाही, पक्षाच्या विचारसरणीशी ते प्रामाणिक राहिले.
आज निर्माण झालेली राजकीय परिस्थिती विलासकाकांच्या विचारांना अभिप्रेत नाही. भाजपला चंचू प्रवेशही नसणाऱ्या सातारा जिल्ह्यात आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पराभूत होत असल्याची खंत यावेळी पाटील यांनी बोलून दाखवली. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे होते. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील इत्यांदी नेते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.