Live Update Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Western Maharashtra Election Result Live 2026 : कोल्हापुरात कट टू कट सामना; भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढाई

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Result live Updates : पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली महापालिकांची मतमोजणीला सकाळी दहापासून सुरुवात झाली आहे. या निकालाचे अपडेट....

Vijaykumar Dudhale

Kolhapur : कोल्हापुरात कट टू कट सामना; भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढाई

कोल्हापूर महापालिकेच्या 81 पैकी 51 विजयी झाल्या आहेत. त्यातील 17 जागा जिंकून भाजप पहिल्या स्थानावर आहे. शिवसेनेने 14, तर काँग्रेसने 14, राष्ट्रवादी काँग्रेस 02 आणित इतरांनी 01 जागा जिंकली आहे. कोल्हापुरात सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरवर कोणाचा झेंडा फडकवणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Ichalkaranji  : इचलकरंजी महापालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; 65 जागापैकी 43 जिंकल्या

इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांपैकी 65 निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने दणदणीत विजयी झाले आहेत. भाजपने 43 जिंकल्या आहेत. शिव शाहू आघाडीने 17, शिवसेना शिंदे गटाने 3, शिवसेना उबाठाने 1 अणि राष्ट्रवादीने - 1 जागा जिंकली आहे.

Sangli : सांगलीत भाजप 12 जागांवर विजयी

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या 31 जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये भाजप 17, काँग्रेस 8, राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 नगरसेवक निवडून आला आहे.

BJP : सोलापुरात आतापर्यंतच्या निकालात 64 पैकी 62 जागा भाजपने जिंकल्या; काँग्रेस अन शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांपैकी आतापर्यंत 64 जागांचे निकाल हाती आले आहेत. या 64 त्यापैकी 62 जागा भाजपने जिंकल्या आहेत. एक जागा नरसिंह असादे यांच्या रूपाने काँग्रेसने, तर एक जागा प्रियदर्शन साठे यांच्या रूपाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिंकली आहे.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का; आनंद चंदनशिवे पराभूत

सोलापुरात भाजपची मोठी लाट दिसून येत आहे. सोलापुरात भाजपचे ३९ जागांवर आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद चंदनशिवे यांचा प्रभाग पाचमधून पराभव झाला आहे. प्रभाग पाच मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे समाधान आवळे, अलका भंवर, मंदाकिनी तोडकरी, बिज्जू प्राधाने हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

Sangli : सांगलीत भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत; नऊ जागांवर आघाडीवर

सांगली महापालिकेत भाजप ९, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ४, काँग्रेस ६, शिवसेना शिंदे गट १ जागेवर आघाडीवर आहे. प्रभाग एक आणि 12 मध्ये भाजपचे पूर्ण पॅनेल विजयी प्रभाग 15 मध्ये काँग्रेसचे पूर्ण पॅनेल विजय झाले आहे. प्रभाग क्रमांक 12 क संजय यमगर विजयी, काँग्रेसचे बबीता मेंढे, संजय मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे करण जामदार विजयी झाले आहेत.

वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये काँग्रेसचे पूर्ण पॅनेल विजयी झाले आहेत. दिगंबर जाधव (राष्ट्रवादी AP) पराभूत, संदीप आवटी (भाजप) विजयी, रेश्मा चौधरी (राष्ट्रवादी AP) विजयी, सागर वनखंडे (शिवसेना शिंदे) विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक तीन क मध्ये शैला दुर्वे, संदीप आवटी विजयी झाली आहेत.

Kolhapur : कोल्हापुरात भाजपचे नऊ, तर काँग्रेसचे पाच उमेदवार विजयी

काँग्रेसचे विजयी उमेदवार

1.सुभाष बुचडे

2. पुष्पा नरुटे

3. रुपाली पोवार

4.सचिन चौगुले...

5- प्रताप जाधव

भाजप

1. वंदना मोहिते

2. राजनंदा महाडिक

3. विजेंद्र माने

4. प्रमोद देसाई

5- दीपा काटकर

6- अर्चना कोराने

7- पूर्वा राणे

8. विजय देसाई

9. माधवी पाटील

शिवसेना शिंदे गट

शीला सोनूले

अजय इंगवले

शरंगधर देशमुख

संगीता सावंत

आशकीन अजगेकर

राष्ट्रवादी

माधवी गवंडी

आदिल फरास

जनसुराज्य

अक्षय जरग

प्रभाग 6 मधून शिवसेनेच्या शीला सोनुले विजयी काँग्रेसचे रजनीकांत सरनाईक पराभूत, काँग्रेसच्या तेजस्विनी घोरपडे यांचा विजय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी पराभूत, काँग्रेसच्या तनिष्का सावंत विजय तर दीपा काटकर या भाजपच्या उमेदवार पराभूत, काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव विजयी, तर शिवसेनेचे नंदकुमार मोरे पराभूत, प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी, तर महायुतीतील शिंदे शिवसेनेचे एक उमेदवार विजयी झाले आहेत.

Solapur : सोलापुरात प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादीचे चंदनशिवे, काळे, गणेश पुजारी तीन, तर भाजपच्या तोडकरी आघाडीवर

पहिल्या फेरीत पाच अमध्ये आनंद चंदनशिवे, पाच ब भाग्यश्री काळे दोन्ही अजित पवार गट, पाच क मंदाकिनी तोडकरी बीजेपी, पाच ड मध्ये गणेश पुजारी अजित पवार गट अशा रीतीने प्रभाग पाचमध्ये तीन अजित पवार गट व एक बीजेपीचे उमेदवार आघाडीवर आहेत

Kolhapur : कोल्हापुरात काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष; जनुसराज्य, राष्ट्रवादीने विजयाचे खाते उघडले

कसबा बावडा इथल्या काँग्रेसच्या विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष केला आहे. कोल्हापुरातील प्रभाग 6 मध्ये शिवसेनेचे शीला अशोक सोनुले - 6766 विजयी झाले आहेत. काँग्रेसचे रजनीकांत सरनाईक 5323 हे पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधवी गवंडी (5449) विजयी, तर काँग्रेसच्या तेजस्विनी घोरपडे (5114) पराभूत.

काँग्रेसच्या तनिष्का सावंत (5827) विजयी भाजपच्या दीपा काटकर (4835) पिछाडीवर, काँग्रेसचे प्रताप जाधव (5967)

शिवसेनेचे नंदकुमार मोरे (4571) हे पराभूत झाले आहेत. कोल्हापूर महापालिकेसाठी जनसुराज्य पक्षाने पहिलं खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक दहामधून अक्षय जरग विजयी झाले आहेत.

Kolhapur : कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का; शिंदे गटात गेलेल्या कट्टर समर्थकाचा दणदणीत विजय

महापालिका निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील यांना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले सारंगधर देशमुख यांनी विजय मिळविला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शारंगधर देशमुख यांनी काँग्रेस सोडून शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला हेाता. तो फायदेशीर ठरल्याचे दिसून येते. शारंगधर देशमुख हे जवळपास 3 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस च्या राहुल माने यांचा पराभव केला आहे.

Solapur ; सोलापुरातून भाजपचे आठ उमेदवार विजयी; पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याचे उघड

सोलापुरात भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक २२ आणि प्रभाग क्रमांक १० चे निकाल हाती आले आहेत. प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपचे अंबिका गायकवाड, किसन जाधव, चैताली गायकवाड, दत्तत्रय नडगिरी विजयी झाले आहेत. प्रभाग 10 मधून भाजपचे प्रथमेश कोठे, दीपिका यलदंडी,सतीश शीरसील्ला, उज्वला दासरी हे विजयी झाले आहेत.

Sangli : सांगलीत मतमोजणीत काँग्रेसची भाजपला धोबीपछाड; काँग्रेसचे सात, भाजपचे सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आघाडीवर

सांगली महापालिकेत काँग्रेस सात, भाजप सहा, राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना एक आणि जनसुराज्य एका जागेवर आघाडीवर आहे. मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेसचे बबीता मेंढे, संजय मेंढे हे विजयाच्या मार्गावर आहेत. सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

Solapur : सोलापुरात भाजपची मोठी आघाडी; २२ जागांवर आघाडी

सोलापुरात आतापर्यंत तीस जागांवर कल हाती आले आहेत. त्यात भाजप सर्वांत पुढे असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने २२, शिवसेना ५ आणि काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे. भाजपाचे उमेदवार प्रथमेश कोठे, उज्ज्वला दासरी, दिपिका यलदंडी, सतीश सिरसिल्ला हे आघाडीवर आहेत.

Ichalkaranji  : इचलकरंजीत शाहू विकास आघाडीचे चौघे विजयी

इचलकरंजीत शाहू विकास आघाडीचे चौघे विजयी इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजपपाठोपाठ शाहू विकास आघाडीचे चौघे विजयी झाले आहेत. त्यात अमृता चौगुले, नंदकुमार पाटील, मदन कारंडे, क्रांती आवळे यांचा समावेश आहे.

Kolhapur : कोल्हापुरात काँटे की टक्कर; काँग्रेस आणि भाजपचे चौघे विजयी

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजय झाले आहेत. यामध्ये प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजेंद्र माने विजयी झाले आहेत. तसेच काँग्रेसचेही चार उमेदवार विजयी झाले आहेत.

Ichalkaranji Corporation Result : भाजपने पश्चिम महाराष्ट्रातून खाते उघडले; इचलकरंजीत चौघे विजयी

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी दहापासून सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चार जणांना विजयी घोषित करण्यात आलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT