Maharashtra Water theft  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Water Theft : महाराष्ट्राचं पाणी कर्नाटकनं चोरलं, 'या' ठिकाणी पोलिसांचा 'खडा पहारा'

Rahul Gadkar

Maharashtra Vs Karnataka : कर्नाटकमध्ये पाण्याची चणचण भासत असल्याने पाण्यासाठी वणवण सुरू आहे. कर्नाटक मधील काही गावांनी महाराष्ट्रातील हद्दीतील नद्यांचे बर्गे काढून पाणी घेण्यास सुरुवात केली असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे. त्यामुळे सोलापूरच्या जिल्ह्याच्या शेवटच्या गावापर्यंत कोल्हापुरातील धरणातील पाणी पोहोचण्यासाठी पाटबंधारे विभाग विशेष मेहनत घेत आहे. तसेच बंधाऱ्यावर बर्गे टाकून शेतकऱ्यांना मुबलक पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, कर्नाटकडून पाणीचोरी होत असल्याने डोकेदुखी वाढणार आहे.

कोल्हापुरमधील Kolhapur राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर येथे कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंधाऱ्यावर बंदोबस्त ठेवून पाण्यावर नजर ठेवण्यात येत आहे. राजापूर बंधाऱ्याच्या पुढे, कर्नाटक राज्यात पाणीटंचाई असल्याने अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. त्यामुळे नदीपात्रातून विसर्ग कर्नाटकला karnataka सुरू होता. आज्ञातांनी हा प्रकार केल्यानंतर ग्रामस्थांनी त्याची माहिती प्रशासनाला दिली.

शासनाची कोणतीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि कर्नाटकमध्ये वाद होऊ नये यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या वतीने राजापूर बंधाऱ्यावर दोन पोलिस आणि दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अशा चार कर्मचाऱ्यांचे दोन शिफ्टमध्ये पथक नियुक्त करण्यात आले आहे. 24 तास राजापूर बंधाऱ्यावर आता पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुन्हा अज्ञातांकडून बंधाऱ्याची बर्गे काढून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 24 तास बंदोबस्त या बंधाऱ्यावर नजर असणार आहे. शिवाय परिसरात पेट्रोलिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत. पोलिसांकडून आज्ञातांचा शोध सुरू आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT