Minister Uday Samant sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uday Samant News : वेदांता फॉक्‍सकॉनची श्‍‍वेतपत्रिका काढणार...उदय सामंत

Udayanraje Bhosale सातारमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यावतीने आयाोजित महारोजगार मेळाव्‍याच्‍या उद्घाटनानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

Satara News : राज्‍यातील सरकार हे युवकांच्‍या हाताला काम देणारे असून, त्‍यासाठीचे उपक्रम सरकार राबवत आहे. वेदांता फॉक्‍सकॉन प्रकल्‍प कोणामुळे बाहेर गेला, याची कल्‍पना राज्‍यातील जनतेला आहे. या प्रश्‍‍नावर आरोप करत राज्‍याची बदनामी करण्‍यापेक्षा सर्वांनी एकत्र येत महाराष्‍ट्राच्‍या विकासाला हातभार लावणे गरजेचे आहे. वेदांता प्रकरणाची श्‍‍वेतपत्रिका लवकरच जनतेसमोर मांडण्‍यात येणार असून, राज्‍यातील सत्तांतरामुळे राजकीय रोजगार हिरावलेल्‍यांसाठी देखील लवकरच राजकीय रोजगार मेळावा घेणार असल्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

महारोजगार मेळाव्‍याच्‍या उद्‌घाटनासाठी उदय सामंत Uday Samant सातारा येथे आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, सुशांत निंबाळकर यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर पत्रकार परिषदेत त्‍यांना राज्‍यातील सत्तांतरामुळे अनेकांचा राजकीय रोजगार हिरावला गेलाय का, या विचारलेल्‍या प्रश्‍‍नाला त्‍यांनी उत्तरे दिली. उदय सामंत म्‍हणाले, साताऱ्याच्‍या औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी उदयनराजे भोसले यांचे प्रयत्‍न सुरू आहेत. या प्रयत्‍नांना बळकटी देण्‍यासाठी मी इथे आलो आहे.

याठिकाणी त्‍यांनी उद्योग विभागाचे विभागीय कार्यालय, युवकांना अत्‍याधुनिक प्रशिक्षण देण्‍यासाठीचे केंद्र आणि कामगारांसाठी रुग्‍णालय असावे, अशी मागणी केली आहे. त्‍यांच्‍या या दोन्‍ही मागण्‍या आम्‍ही मान्‍य करत असून, जागा उपलब्‍ध झाल्‍यानंतर त्‍याबाबतची पुढील कार्यवाही सुरू होईल.

अजितदादांच्या सल्‍ल्‍याची गरज नाही...

भाजप आणि मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या नेतृत्‍वाखालील शिवसेना एकमेकांच्‍या साथीने व्‍यवस्‍थित काम करत असल्‍याने विरोधी पक्षनेते अजित पवार किंवा इतरांच्‍या सल्‍ल्‍याची आम्‍हाला गरज नाही. त्‍यांनी आम्‍हाला सल्‍ले देण्‍याऐवजी महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे का?, याची खातरजमा करणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही त्यांनी मांडले. गत एक वर्षात राज्‍यातील उद्योगांची संख्‍या १३ हजारांनी वाढल्‍याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT