Maharastra Politics
Maharastra Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharastra Politics : 'बूथ' बांधणीत महाविकास आघाडीचे भाजपच्या पावलावर पाऊल; दोन्ही काँग्रेस लागल्या कामाला...

सरकारनामा ब्यूरो

Solapur : राज्यातील १४ महापालिका व २५ जिल्हा परिषदांसह दोन हजार ४४८ नगरपालिका, नगरपंचायतींसह सर्वच पंचायत समित्यांवर प्रशासक आहे. प्रशासकाचा एक वर्षाचा कालावधी होऊनही अजून निवडणुकीसंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. परंतु, मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असून त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल.

तत्पूर्वी, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप, शिंदेगट, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी,ठाकरे गट यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होतील. तत्पूर्वी, भाजपसह महाविकास आघाडीने बूथ यंत्रणा सक्षम करण्याचा कृती आराखडाच तयार केला आहे. यासाठी भाजप(BJP)ने प्रत्येक बुथवर ३० जणांची नेमणूक करून त्यांच्यावर केंद्र व राज्याच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महागाई, बेरोजगारी आणि राज्याच्या सत्ता संघर्षाच्या निकाल वाचनावर फोकस असणार आहे.

सध्या राज्यातील १४ महापालिका व २५ जिल्हा परिषदांसह दोन हजार ४४८ नगरपालिका, नगरपंचायतींसह सर्वच पंचायत समित्यांवर प्रशासक आहे. प्रशासकाचा एक वर्षाचा कालावधी होऊनही अजून निवडणुकीसंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. परंतु, मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असून त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. तत्पूर्वी, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ शकते.

बूथ बांधणीवर पक्षांचा भर

या पार्श्वभूमीवर आता काँग्रेससह महाविकास आघाडीती(Mahavikas Aaghadi) ल सर्वच पक्षांनी बूथ बांधणीवर विशेष लक्ष द्यायला सुरू केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १५ जूनपूर्वी बूथ पदाधिकाऱ्यांची निवड होईल असे यापूर्वीच जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पदाधिकाऱ्यांना बूथ बांधणी मजबुतीकरणावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. बूथ यंत्रणा मजबूत असल्याशिवाय सहजासहजी यश मिळणार नाही, याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. बुथवरील प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भाजपची बूथ यंत्रणा 'अशी' असणार...

- प्रत्येक बुथवर ३० कार्यकर्त्यांची निवड; बुथप्रमुख, बूथ प्रभारी व सचिवांकडे प्रमुख जबाबदारी

- पक्षाचे अधिकृत सहा सदस्य असतील बुथवरील पदाधिकारी; महिला आघाडी, ओबीसी, युवा मोर्चा, प्रमुख आघाड्यांचे पदाधिकारीही त्यात असणार

- प्रत्येक बुथवर एक ‘बीएलए’आणि त्याच्या जोडीला तीन कार्यकर्ते

- विधानसभेच्या प्रत्येक बुथवर १५ बुद्धिजीवी (प्राध्यापक, वकील, सीए असे प्रभावी लोक) व्यक्तींची नेमणूक

- मतदार यादीच्या प्रत्येक पानानुसार पन्नाप्रमुख असणार; त्यातील कुटुंबाच्या भेटीगाठी घेऊन नऊ वर्षांचा मोदी सरकारचा लेखाजोखा मांडला जाणार

- मोदी व शिंदे-फडणवीस सरकारच्या योजनांच्या लाभार्थींना एकत्रित करून बुथनिहाय घेतले जाणार संमेलन

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT