Dhananjay Mahadik sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Loksabha News : महाविकास आघाडीतील मोठे नेते लवकरच भाजपमध्ये; धनंजय महाडिकांनी दिले संकेत

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha News : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत महायुतीचा उमेदवार कोण, याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला आहे. त्यावरून विरोधकांनीदेखील कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या लोकप्रतिनिधीवर हल्लाबोल चढवला आहे. अशातच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार गटातील एक मोठा नेता भाजपमध्ये येणार आहे. त्यामुळेच महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर महाडिक यांनी हे सूचक विधान केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. लोकसभेपूर्वी एक मोठे नेते भाजपसोबत येतील. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप 400 पार जाणार आहे. त्यानंतरदेखील काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.

महायुतीमध्ये जागावाटपाचा कोणताही घोळ नाही आमचे तीनही नेते सक्षम आहेत. भाजपकडे जागा असावी, अशी कोणतीही आग्रही मागणी आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे की एक जागा आपल्याकडे घ्यावी. मात्र, वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी देण्यावरून भाजपचे नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी विरोध दर्शवला आहे. त्यावरदेखील धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदाधिकारी आणि नेत्यांनी अशी वक्तव्यं करू नयेत. कार्यकर्त्यांनी अशी वक्तव्यं करताना विचार करावा, अशा शब्दांत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनावले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT