Kolhapur Bazar Samiti
Kolhapur Bazar Samiti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Bajar Samiti Results : निष्ठावंतांची चेष्ठा अन् गद्दारांची प्रतिष्ठा; भाजप हद्दपार...बाजार समितीच्या मतपेटीत...

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur Bajar Samiti Results : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने सत्ता कायम राखली आहे. आघाडीने 18 पैकी 16 जागांवर विजय मिळवला. तर विरोधी आघाडीला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले, एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्येही सभासदांनी नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. यामध्ये सर्वच नेत्यांना फैलावर घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनाही भाजपकडे (BJP) लक्ष देण्याचा सल्ला दिली आहे. यामध्ये दोन कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या चांगल्याच लक्षवेधी ठरल्या.

एका चिठ्ठीत चंद्रकांतदादा मार्केट कमिटीला भाजपचा उमेदवार आहे कुठे, नाव भाजपचे आणि काम गटाचे आहे. महाडिक गट, घाटगे गट, देसाई गट, आवाडे गट. भाजप संघटना जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. हे गट सत्ता आहे म्हणून आहे, सत्ता गेली हे गेली मग हुडकता जुने कार्यकर्ते. स्वतःचा कार्यकर्ता मोठा करावा, नंतर नेता पक्ष मोठा होतो.

दुसऱ्या एखा चिट्ठीत म्हटले आहे की ''दादा थोडे निष्ठावंतांकडे वळून पहा कारण की निष्ठावंत चेष्टा व गद्दारांची प्रतिष्ठा हे कुठेतरी थांबले पाहिजे. दादा तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तरी त्यांचा भंग होऊ देऊ नका. आपलाच निष्ठावंत कार्यकर्ता मरेपर्यंत... असे म्हटले आहे.

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत मतासाठी देण्यात आलेले हजार रुपये एका मतदाराने परत केले आहेत. ते पैसे कोणी दिले याचा उल्लेख न करता त्यांनी ते निवडणूक आयोगाला परत पाठवून देण्याची विनंती केली. त्यामुळे मतांसाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांना एकप्रकारे चपराक दिली बसली आहे. कोल्हापूर बाजार समितीवर महाविकास आघाडीने 16 जागांवर विजय मिळवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT