Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : 'जमेत धरलं नाही, मी लंडनला गेल्यावर...', भाजप-शिवसेनेवर आरोप करत मुश्रीफांचा इशारा; म्हणाले, 'तर त्या ठिकाणी बंडखोरी...'

Kolhapur Mahayuti Rift : एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिथे शक्य आहे. तिथे एकत्र जिथे शक्य नाही तिथं स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये एकीचे बळ राहील अशी शक्यता कमीच आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 27 Sep : एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिथे शक्य आहे. तिथे एकत्र जिथे शक्य नाही तिथं स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये एकीचे बळ राहील अशी शक्यता कमीच आहे.

अशातच कोल्हापुरात देखील महायुतीत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या जागावाटपात पहिली ठिणगी पडली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी जवळपास 30 जागांची मागणी केल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी जवळपास 50 जागांची मागणी केली.

त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी थेट भाजप आणि शिवसेनेचे कान टोचत एक प्रकारे आपल्याला कमी न समजण्याचा इशाराच महाडिक आणि क्षीरसागर यांना दिला आहे. आम्ही लंडनवारीमध्ये असताना राज्यसभेचे भाजपचे खासदार आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे विद्यमान आमदार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटून घेतल्या आहेत.

एकाने 80 जागा वाटून घेतल्या आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या. आम्हाला कुठेही जमेत धरलं नाही. त्यामुळे मी म्हणालो कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. कुणी काहीही म्हटलं तरी महानगरपालिका आम्हाला ताकतीने लढावी लागेल. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे मी काही भाकीत करणार नाही. त्या ठिकाणी कदाचित बंडखोरी होईल.

पण आमचं ठरलं आहे. ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करायची. ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढायचं. महापालिकावर युतीचा झेंडा फडकवायचा आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशी तयारी आम्ही केली आहे.

ज्याचे नगरसेवक होते. त्या जागेचे पहिल्यांदा वाटप होईल आणि त्यानंतर उरलेल्या जागेचं चर्चा करून वाटप होईल. हे दोन्ही पक्ष महापालिकेच्या सत्तेत कुठंही दिसत नव्हते. गेले 25 वर्ष आम्ही सत्तेत होतो हे त्यांना लक्षात घ्यावच लागेल, आम्हाला जमेत धरत नाही म्हणून हे बोलावं लागतं, असेही मुश्रीफ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT