Tasgaon Mahayuti Politics; Ajit Pawar, CM Devendra fadnavis And DCM Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : महायुतीत राष्ट्रवादीची बंडखोरी! माजी खासदाराचा एक निर्णय अजित पवारांसाठी डोकेदुखी वाढवणार?

Tasgaon Politics : नगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना आता राजकारण जोरदार सुरू झाले आहे. राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

Aslam Shanedivan

  1. अजित पवार यांनी 288 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली.

  2. मात्र, राष्ट्रवादीचे माजी खासदार यांनी तासगाव निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेत महायुतीला धक्का दिला.

  3. या निर्णयामुळे महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळून येत असून राजकीय वातावरण तापले आहे.

Sangli News : आगामी नगरपरिषदांची निवडणूक जाहीर झाली असून सोमवार (ता.10) पासून इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज भरावे लागणार आहेत. या गोष्टीला फक्त आता आजची रात्र शिल्लक आहे. मात्र अद्याप राज्यासह जिल्ह्यात महायुतीतील युती आणि महाविकास आघाडीची आघाडीबाबत निर्णय झालेला नाही. यामुळे स्थानिक नेत्यांसह इच्छुक संभ्रमात आहेत. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात 288 नगरपरिषदा-नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महायुती म्हणून आम्ही एकत्रित जनतेपुढे जावे अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पण आता त्यांची ही इच्छा त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे दिसत आहे. सांगलीत माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव नगरपालिका स्वबळावर लढवणार असून कुणाशी आघाडी वगैरे करणार नाही असे म्हणत एकप्रकारे महायुतीलाच फाट्यावर मारले आहे. यामुळे येथे महायुतीत ठिणगी पडल्याचे आता बोलले जात आहे.

संजयकाका पाटील यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली असून ते म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडी करण्याबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील तसेच काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा झाली आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर एकत्र बसू, असा निरोप त्यांनी दिला आहे. यामुळे भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत येथे महायुती नाही तर स्थानिक आघाडी होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. तसेच काँग्रेसचे नेते आमदार विश्‍वजित कदम यांच्याशीही चर्चा झाली आहे. सध्या नगरपालिका निवडणूक सुरू आहे. त्यानंतर एकत्र बसू असा त्यांनी निरोप दिला आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसून चर्चा करू. तासगाव नगरपालिका स्वबळावर लढवणार आहे. कुणाशी आघाडी वगैरे करणार नाही. काही स्थानिक घटक एकत्र येतील असेही संजयकाका पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

रोहित पाटील यांना साद

दरम्यान शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. त्याला पुन्हा उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे श्रेयवाद सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढू, असे आवाहनही संजयकाका पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांना केले आहे. त्यांनी, सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डावा-उजवा कालव्याच्या कामाबाबत आपण खासदार असतानाच (2023) पाठपुरावा केला होता. ज्याला आता गती मिळाली आहे. तसेच 24.62 कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामालाही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेऊन आमदारांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. ही संघर्ष करण्याची वेळ नाही. शेतकरी कोलमडून पडला आहे. राजकीय संघर्ष थांबवून शेतकरी उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांनी एकत्र येवून लढा द्यावा अशी साद घातली आहे.

या आव्हानाला रोहित पाटलांचा पलटवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांनी एकत्र येवून लढा द्यावा, अशी साद संजयकाका पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांना घातली आहे. यावरून आमदार रोहित पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच रोहित पाटील यांनी, काकांनी मला एका व्यासपीठावरून एकत्र येण्याची साद घातली होती. त्याबद्दल मी आता विचार करत असून त्यांच्या मराठीची काही गफलत आहे की त्यांचे व्याकरण याचाच मी अभ्यास करत आहे. तो झाला की मी त्यावर उत्तर देईन असेही रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT