-रविकांत बेलोशे
Makrand Patil News : राजपुरी व आंब्रळ या दोन गावांचा सड्यावरील तळ्याच्या कामामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार हे पाहणी दरम्यान निदर्शनास येताच आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी जागेवरून थेट अधिकाऱ्यांना फोन लावला आणि या कामासाठी ३० लाख रुपयांचा वाढीव निधीची तरतूद करून आबांनी आश्चर्याचा धक्का दिला पण आपली समाजाची बांधिलकी ही दाखवून दिली.
आंब्रळ (ता. महाबळेश्वर) येथे पाण्याचे टाकीचे भूमिपूजन, ग्रामपंचायत इमारत उद्घाटन, रस्ता नामकरण अशा विविध कार्यक्रम आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपूरे, संजूबाबा गायकवाड, प्रवीण भिलारे,स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे, सहायक पोलिस निरिक्षक राजेश माने, सरपंच माधुरी आंब्राळे उपस्थित होत्या.
यावेळी मकरंद पाटील यांनी टेबलपॉइंटवरील राजपुरी व आंब्रळ बाजूकडून निसर्ग रम्य परिसराचा फायदा पर्यटकांना देवून त्यांची आर्थिकवृद्धी करण्याचा दृष्टीने आम्ही विचार करीत असून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन राजेंद्रशेठ राजपुरे यांनी केले.
यावेळी सड्यावर चालू असलेल्या कामाच्या ठेकेदार व कामगारांना बोलावून माहिती घेतली व थेट अधिकाऱ्यांना फोन करून दहा लाखांत काम होणार नाही. आणखी २० लाख वाढवा, असे सांगितले. या कामासाठी ३० लाख रुपयांचा वाढीव निधीची तरतूद करून आबांनी आश्चर्याचा धक्का दिला. अधिकाऱ्यांनी ही त्याला लागलीच दुजोरा देत आम्ही ते काम पूर्ण करू, असे सांगितले. यातून मकरंद आबांची समयसूचकता दिसून आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.