कोयनानगर : ''कोयनानगरला पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. येथील पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकरात लवकर तयार करून मंजूर कामे तत्काळ पूर्ण करावीत,'' अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
वन्यजीव विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या मंजूर विकासकामांचा आढावा मंत्री देसाई यांनी घेतला. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रांताधिकारी सुनील गाढे, वन्यजीव विभागाचे उपसंचालक उत्तम सावंत, तहसीलदार रमेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, नियोजन समिती सदस्य जयवंतराव शेलार, कोयनेचे उपकार्यकारी अभियंता सागर पाटील, उपअभियंता आशिष जाधव, अशोकराव पाटील, शैलेंद्र शेलार उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले,‘‘ कोयना धरण परिसरात पर्यटक वाढावेत, यासाठी चांगली कामे करा. नेहरू उद्यानासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यातून उद्यानातील नवीन कामे हाती घ्यावीत. उद्यानात विविध फुलांची झाडे लावण्यावर भर द्यावा. कोयनानगरला पर्यटन परिचय केंद्र उभे करायचे आहे. त्याचा आराखडा तयार करावा. त्यासाठी आर्किटेक्चरची नेमणूक करावी. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण, कारंजाचे सुशोभीकरण, जीर्ण विश्रामगृहाचे नूतनीकरणाची कामे हाती घ्यावीत.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.