Balasaheb Patil, Nitin Patil
Balasaheb Patil, Nitin Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नितीन पाटलांना बॅंकेचे अध्यक्ष करा; कोरेगावातील कार्यकर्त्यांची सहकारमंत्र्यांकडे मागणी

सरकारनामा ब्युरो

कऱ्हाड : सातारा जिल्हा बॅंकेतील मक्तेदारी संपवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खऱ्या संचालकाला अध्यक्षपद मिळावे. त्यासाठी बॅंकेचे अध्यक्षपद माजी खासदार (कै) लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र नितीन पाटील यांनाच द्यावे, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील खासदार पाटील समर्थकांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आज केली.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकारमंत्री पाटील विजयी झाल्याबद्दल कोरेगाव तालुक्याच्यावतीने त्यांचा सह्याद्री साखऱ कारखान्याचे संचालक कांतीलाल पाटील व सहाकऱ्यांनी सत्कार केला. त्यानंतर त्यांनी सहकारमंत्री पाटील यांच्याकडे खासदार (कै) पाटील यांच्या पश्चात नितीन पाटील यांना अध्यक्ष करावे अशी मागणी केली. त्यानंतर बोलताना सह्याद्रीचे संचालक कांतीलाल पाटील म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेत सहकाराची मक्तेदारी संपवुन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील चांगल्या मताने विजयी झाले आहेत. सातारा जिल्ह्याचे नेतृत्व खऱ्या आर्थाने पालकमंत्र्यांकडे आले आहे.

त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हितासाठी सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सच्या कार्यकर्त्याला द्यावे अशी आमची अपेक्षा आहे. माजी खासदार (कै) लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील यांनी गटतट विसरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी चांगले काम करुन सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीच्याच संचालकाला जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद मिळाले पाहिजे. त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळुन जिल्हा बॅंकेतील मक्तेदारी संपेल. त्यासाठी जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नितीन पाटील यांना द्यावे, ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT