Solapur News: माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत ईव्हीएमविरोधात गावकऱ्यांनी जन आंदोलन उभारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मारकडवाडी येथील गावकऱ्यांशी संवाद साधला.
गावकऱ्यांच्या फेरमतदानाला विरोध करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारला. 'या सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे द्या, आम्ही तुमचा आवाज सत्ताधारी, निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू," असे पवार यांनी गावकऱ्यांना सांगितले.
"जमावबंदीचे रेकॉर्ड, फेरमतदानासाठी काय केले, या सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे द्या. आम्ही ते राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोगाकडे देऊ," असे पवार म्हणाले. यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
मारकडवाडीने या निवडणुकीतील ईव्हीएमवरील शंकेमुळे देशाला जागे केले आहे. आम्हाला दिल्लीत अनेक आमदार, खासदार भेटतात, ते विचारतात, मारकडवाडी गाव कुठे आहे, हे विचारतात. अमेरिका, इंग्लड आदी देशात बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक होत आहेत. जगात बॅलेट पेपरवर निवडणूक होते, आपल्याकडे का होत नाही, असा सवाल पवारांनी विचारला. अनेक देशांनी ईव्हीएम वापरणे बंद केले आहे. आपणही त्याचा विचार केला पाहिजे, त्यात बदल करणे गरजेचे आहे. बॅलेटवर मतदान ही निवडणुक पद्धत स्वीकारली पाहिजे, असे पवार म्हणाले.
अमेरिका, इंग्लंड येथेही मत मतपेटीत टाकलं जातं. यूरोप खंडातील सर्व देश ईव्हीएम वापरत नाहीत.
अनेक देशांनी ईव्हीएम न वापरण्याता निर्णय घेतला. मग भारतातच असे का केले नाही?
निवडणूक यंत्रणांचा काळ एकदा सोकावला तर तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही.
सर्व माहिती घ्या. तालुक्याच्या सर्व गावात ठराव करा. आम्हाला आम्हाला ईव्हीएमवर मतदान नको.
जुन्यापद्धतीने मतदान करायचं आहे. त्या ठरावाची प्रत उत्तम जानकरांकडे द्या. त्यावर आम्ही निर्णय घेऊ.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.