shivaji maharaj statue rajkot fort sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Malvan Rajkot Fort : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांची पहिली मोठी कारवाई

Shivaji Maharaj Statue Collapse : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातच पोलिसांनी एकास ताब्यात घेतलं आहे.

Rahul Gadkar

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुतळा कोसळल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी चेतन पाटील याला अटक केली आहे. मध्यरात्री पोलिसांनी चेतन पाटील याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे ( कल्याण ) आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी ( 26 ऑगस्ट ) गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक अभियंता अजित पाटील यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन पाटील हा घरातून फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी मालवणचे एक पोलिस पथक कोल्हापुरात तळ ठोकून होते. गुरूवारपर्यंत त्याचा शोध पोलिसांना लागला नव्हता.

मालवण आणि कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली होती. मात्र, चेतन पाटीलचे दोन्ही फोन बंद असल्यानं पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पण, गुरूवारी मध्यरात्री चेतन पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.

चेतन पाटील याला मालवण पोलिस ठाण्यात आणलं जाणार असून त्याची चौकशी करण्यात येईल. चौकशीतून शिवरायांच्या पुतळ्याबाबत कोणती नवीन माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. चेतन पाटील याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जो चबुतरा उभारला होता, त्याचे डिझाईन नौदलाला तयार करून दिलं होतं.

जयदीप आपटे फरार....

याप्रकरणातील दुसरा आरोप जयदीप आपटे हा देखील फरार आहे. जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्यास आहे. पण, पोलिसांचे पथक आपटेच्या घरी गेल्यानंतर, त्याच्या घराला कुलूप लावण्यात आल्याचं निदर्शनास आलं होतं. यानंतर पोलिसांनी माहेरी गेलेल्या जयदीप आपटे याच्या पत्नीची चौकशी केली. त्यामुळे आता जयदीप आपटेला कधी पकडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT