Congress Man Assembly Election 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Man Assembly Election 2024 : माण मतदारसंघावर काँग्रेसचाच हक्क

Man assembly elections 2024 : माण मतदारसंघ काँग्रेसचा आहे. येथे पक्षाची ताकद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन पहिल्या यादीत माणच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक अमरित ठाकूर यांच्यापुढे केली.

सरकारनामा ब्युरो

Satara News, 11 Oct : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात माण-खटाव मतदारसंघ हा काँग्रेसचा (Congress) असून, येथे पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा.

तसंच पहिल्या यादीतच माणच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे, अशी मागणी माणच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक अमरित ठाकूर यांच्यापुढे केली.

काँग्रेस (Congress) भवनात माढा लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक अमरित ठाकूर यांनी माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मते जाणून घेतली. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, रणजितसिंह देशमुख, नरेश देसाई, बाबासाहेब कदम, संदीप चव्हाण, संदीप माने, डॉ. महेश गुरव आदी उपस्थित होते.

बैठकीत माण मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत मुद्देसूद मागणी केली. माण मतदारसंघ काँग्रेसचा आहे. येथे पक्षाची ताकद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन पहिल्या यादीत माणच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे.

माणमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्येच लढाई आहे. काँग्रेसने अनेक निवडणुका लढवून जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने यापूर्वीही माण, कराड (Karad) दक्षिण आणि वाई मतदारसंघांची अनेक वेळा मागणी केलेली आहे.

दरम्यान, अमरित ठाकूर म्हणाले, "जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी व निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर स्थानिक स्तरावर सूक्ष्म नियोजन केल्यास निश्चित यश मिळेल. त्यासाठी प्रत्येक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT