Bribery in Koregaon Taluka sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon Bribe News : ४० हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

Bribe गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई न करण्याबाबत मंडलाधिकारी संजय बोबडे याने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

Umesh Bambare-Patil

Koregaon News : गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी येथील मंडलाधिकाऱ्यास ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. संजय रावसाहेब बोबडे (वय ५७) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही करवाई केली.

याबाबत पोलिसांनी Police दिलेली माहिती अशी, की पिंपोडे बुद्रुक येथील तक्रारदारास मोरबेंदवाडी गावातील गट क्रमांक २८ मधील जमिनीतून स्वखर्चाने गाळ, मुरूम, माती काढून वाहतूक करायची होती. त्यासाठी भाड्याने वापरलेला जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करू नये, तसेच गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई न करण्याबाबत मंडलाधिकारी संजय बोबडे याने ५० हजारांच्या लाचेची Bribe मागणी केली होती.

तडजोडीअंती ४० हजार ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्याची पडताळणी २४ मे रोजी करण्यात आली होती. त्यानुसार सापळा लावून ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक (पुणे) अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, साताऱ्याच्या पोलिस उपअधीक्षक श्रीमती उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा पथकातील साताऱ्याचे पोलिस निरीक्षक विक्रम पवार, हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे यांनी केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT