NCP leader Prakash Patil News
NCP leader Prakash Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP leader Prakash Patil News : राष्ट्रवादीचे मंगळवेढा अध्यक्ष पी. बी. पाटील अपघातात गंभीर जखमी

हुकूम मुलाणी

Mangalwedha News : मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भिवाजी पाटील उर्फ पी. बी. पाटील (सर) यांचा अपघात झाला आहे. ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातून मंगळवेढ्याकडे परतत असताना उरळी कांचन जवळ मध्यरात्री दोन वाजता चहा पिण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात असताना सोलापूर वरून पुण्याकडे (Pune) जात असणाऱ्या लक्झरीने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले.

अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली असून उरळीकांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे वृत्त मंगळवेढ्यात समजतात त्यांच्या नातेवाईकाकडे विचारणा केली जात आहे. अनेक अफवांना ऊत आला असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राजकीय संघर्ष करत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेपासून कार्यरत आहेत.

त्यांनी मतदारसंघ अध्यक्ष तसेच प्रांतिक सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात त्यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठा जनसंपर्क आहे. पाटील यांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले ''की पाटील यांना 48 तास डॉक्टरच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कृपया कोणत्याही अफवा पसरू नका अथवा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजतात आमदार समाधान आवताडे (Samadhan Awatade), माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी फोन करुन पाटील यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली आहे. तर पंढरीनाथ माने, दिनकर यादव, रामेश्वर मासाळ हे सध्या रुग्णालयात आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT