Manoj Jarange Patil Satrkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange : जरा दमानंचं गाजवणार छत्रपती चौकातील सभा; मनोज जरांगे पाटील आज कोल्हापुरात

Rahul Gadkar

Kolhapur News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी योद्धा म्हणून लढणारे मनोज जरांगे आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी सांगली येथून निघाल्यानंतर ते इस्लामपूर, आष्टा, कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे भेटी देत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभा घेणार आहेत.

मात्र कालपासून या सभेसाठी जय्यत तयारी सुरू होते. मात्र काल कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचा वारसा असणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर नियोजन समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील हे कोल्हापुरात येतात केवळ त्यांची घोषणेने स्वागत होईल. तसेच होणारी सभा जरा दमानंचं होणार असल्याची माहिती आहे.

कोल्हापुरात आज मराठा आरक्षण (Maratha reservation) लढा लागणारे मनोज जरांगे यांची सभा आणि शांतता रॅली होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांची सभा होणार आहे. तर शहरातील प्रमुख चौकातून त्यांची रॅली होणार आहे. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीच काल रात्री केशवराव नाट्यगृह येथे आगेची घटना घडल्यानंतर त्यांच्या दौऱ्यात थोडासा बदल करण्यात आला आहे.

मनोज जरांगे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ऐतिहासिक दसरा चौक येथे छत्रपती शाहू स्मारक पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. तसेच शहरातील प्रमुख चौकातून ढोल बाजा न वाजवता केवळ घोषणेतून शांतता रॅली काढणार आहेत. त्यानंतर संगीत सूर्य केशवराव नाट्यगृह येथे घटनास्थळी भेट देणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांची सभा दुपारी तीननंतर होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यावर परिणाम

आगीची घटना घडल्यानंतर त्याचा परिणाम मनोज जरांगे यांच्या दौऱ्यावर पडला आहे. आरक्षणाचे जनक शाहू महाराज छत्रपती यांच्या दूरदृष्टी विचाराने उभा राहिलेल्या संगीत सूर्य केशवराव नाट्यगृह इमारतीचे आगीमुळे पडझड झाल्याने त्याचा शोक कोल्हापूरवासियांना आहे. त्यामुळे या घटनेचा अप्रत्यक्षपणे परिणाम मनोज जरांगे यांच्या दौऱ्यावर पडलेला दिसून येतो. दौऱ्यापूर्वी त्यांच्या स्वागताची तयारी कोल्हापूरवासियांकडून करण्यात आली होती. मात्र कालच्या घटनेनंतर दौऱ्याची कोणतीच वातावरण निर्मिती कोल्हापुरात दिसून येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT