Maan Manse signature campaign sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Manse News : मनसेची माणमध्ये 'एक सही संतापाची' मोहिम...

Umesh Bambare-Patil

-फिरोज तांबोळी

Gondawale Budruk News : महाराष्ट्राच्या राजकारणात मतदानानंतर मतदारांचा विचार केलाच जात नसल्याने जनसंताप शासनाच्या निदर्शनास आणून देऊन स्वार्थी नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'एक सही संतापाची' मोहीम सुरू केली आहे.गोंदवले बुद्रुकमध्ये आज सकाळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

धैर्यशील पाटील म्हणाले,राज्याच्या एक राजकारणात Maharashtra Politics गेल्या काही वर्षात पक्षांचीच पळवापळवी सुरू आहे. मतदारांच्या मतांवर Votes निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना जनतेच्या विकासापेक्षा स्वविकास महत्वाचा वाटत आहे. लोकसेवक असणाऱ्या या नेत्यांनी आपले भ्रष्टाचार झाकण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न चालवले आहेत.

शिवसेनेमधील फूट प्रकरण ताजे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण होऊन आपसात स्वार्थीपणाची लढाई सुरू आहे.यामध्ये मतदारांच्या मतांचा सर्वांना विसर पडला आहे.या राजकारणातील वागणुकीचा जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हा संताप निदर्शनास आणण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने एक सही संतापाची ही मोहीम राज्यभर सुरू केली आहे. गोंदवले बुद्रुक येथील मुख्य चौकात आज सकाळी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे,खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे,महेश बागल,विट्ठल जाधव, चैतन्य पाटील,प्रथमेश नवले,निलेश सोनवणे,विश्वराज कट्टे,रोहित जाधव,शंभूराज पाटील,रणजित पडमलकर, श्रीराम कट्टे,वैभव पाटील यांच्यासह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT