Manyachiwadi Grampanchayat
Manyachiwadi Grampanchayat sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'माझी वसुंधरा'त मान्याचीवाडी सर्वोत्तम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या गौरव

राजेश पाटील

ढेबेवाडी : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीचा उद्या (ता. ५) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र आज हाती पडताच मान्याचीवाडीत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी पेढे व साखर वाटून आनंद साजरा केला.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, तंटामुक्ती, यशवंत पंचायत राज अभियान, स्मार्ट ग्राम आदी उपक्रम व स्पर्धामधून यशस्वी कामगिरी करत आतापर्यंत ६१ पुरस्कारांची मानकरी ठरलेल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध स्पर्धांतून सहभाग घेतला होता. भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वावर ही स्पर्धा आधारलेली होती.

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने नवीन वृक्ष लागवड, जुन्या झाडांचे संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, रोपवाटीका, फटाकेमुक्ती, प्लास्टिक बंदी, सेंद्रीय खत निर्मिती, बायोगॅस या अनुषंगाने अनेक उपक्रम राबवले. ग्रामस्थांचाही त्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा उद्या (रविवारी) सकाळी साडेदहा वाजता नरिमन पॉईंट येथे सत्कार होत आहे. याबाबतचे पत्र हाती पडताच पदाधिकारी आणि मान्याचीवाडी ग्रामस्थांनी पेढे व साखर वाटून आनंद साजरा केला.

यावेळी सरपंच रवींद्र माने, उपसरपंच आधिकराव माने, सदस्य रामचंद्र पाचुपते, संगीता माने, लता आसळकर, सुजाता माने, उत्तमराव माने, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब माने, पोलिस पाटील विकास माने, ग्रामविकास आधिकारी प्रसाद यादव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रवींद्र माने म्हणाले, ‘‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम राबविण्यात आले. या निमित्ताने पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संस्कार गावकऱ्यांच्या मनामनावर कोरलेला आहे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT