Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीने विविध पातळीवर जोर धरला असून, यात अनेक मराठा तरुण आत्महत्या करत आपले जीवन संपवत आहेत. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा युवकांना लढा द्या, पण आत्महत्या करू नका, अशी कळकळीची विनंती केल्यानंतरही मराठा तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही.
संगमनेर तालुक्यातील झोळे येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३१) ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे. सागर भाऊसाहेब वाळे (वय२५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)
राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाची धग पोहोचली असून, आंदोलन हिंसक बनत चालले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी इथे आमरण उपोषण आंदोलन करत आहेत.
त्यांनी सुरुवातीपासूनच मराठा समाजाने शांततेने आणि अहिंसक मार्गाने साखळी उपोषण करत आंदोलन करावे, अशी विनंती मराठा सकल समाजाला केलेली आहे. मात्र, असे असले तरी गेल्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी विशेष करून बीड जिल्ह्यात आंदोलनाने हिंसक रूप घेतल्याने आंदोलनाचा भडका उडाला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे काही वर्षांपूर्वी निघालेले मूक मोर्च असो किंवा आता मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आंदोलन असो, या दरम्यान राज्यात विशेष करून मराठवाड्यातील अनेक मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनीही मराठा युवकांना आत्महत्या करू नये, असे आवाहन केले असले तरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.
एक मराठा लाख मराठा असा चिठ्ठीत उल्लेख करत संगमनेर तालुक्यातील झोळे येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३१) ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे. सागर भाऊसाहेब वाळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये त्याने आत्महत्या केली. त्या ठिकाणी एक वही सापडली असून, त्यामध्ये आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा. आपला लाडका सागर मराठा, असा उल्लेख चिठ्ठीत केलेला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर वाळे हा तरुण झोळे येथे राहत असून, तो संगमनेर येथे काम करत आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्व जेवण करून झोपले होते.
मंगळवारी सागर हा घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन मृत झाल्याचे आढळून आले. दरम्यान, घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह खाली घेतला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.