Jlana : राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी आरक्षण प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ता. 11 पासून मराठवाडा दौऱ्यावर येत आहे. समिती प्रत्येक जिल्हास्थानी बैठक घेऊन पुरावे तपासणार आहे.
समितीने संभाजीनगर विभागीय आयुक्त यांना दिलेल्या पत्रात दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक दिले आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज समितीस उपलब्ध करून देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे समितीची पहिली बैठक होणार आहे.
दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे तर दि. 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी अकरा वाजता समितीच्या बैठका होणार आहेत.
दि. 17 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकाळी अकरा वाजता, तर दि. 18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सकाळी अकरा वाजता समितीच्या बैठका होणार आहेत.
दि. 21 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे सकाळी अकरा वाजता, तर दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे, तर दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बीड येथे समितीच्या बैठका होणार आहेत.
बैठकांमुळे शासन अॅ क्टिव्ह मोडवर
न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या मराठवाडा दौऱ्यामुळे मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून, शासन अॅ क्टिव्ह मोडवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा समाजातील नागरिकांनी कुणबीबाबतचे पुरावे असल्याचा दावा केला होता. समितीच्या दौऱ्यामुळे नागरिकांना त्यांच्याजवळ असणारे पुरावे शासनाला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या समितीच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधात कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.
मनोज जरांगे यांनी शुक्रवार, दि. 6 रोजी जालना जिल्ह्यातील आष्टी येथे सभा घेतली. या वेळी त्यांनी समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले. दि. 1 जून 2004 रोजीच्या शासननिर्णयानुसार मराठा व कुणबी एकच आहेत. त्यात सुधारणा करून कायदा करण्यात यावा व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.