Raj Thackeray ,Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Manoj Jarange Patil: 'ठरवलं असतं तर धाराशिव बाहेर जाऊ दिलं नसतं', मनोज जरांगेंचा राज ठाकरेंना इशारा

Maratha reservation manoj jarange Patil Raj Thackeray : मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूरमधील आपल्या रॅलीत सत्ताधाऱ्यासंह विरोधपक्षांवर देखील टीका केली. माझ्या नादाला लागू नका नाहीतर सोडणार नाही, असे आव्हान जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना दिले.

Roshan More

Manoj Jarange Patil : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा तरुण संतप्त झाले होते. राज ठाकरे धाराशिवला आले होते तेव्हा मराठा आंदोलक ठाकरे मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये शिरले होते. या आंदोलकांशी चर्चा करताना राज ठाकरे आपल्या वक्तव्यावर ठाम होते. मात्र, राज ठाकरेंच्या विरोधात झालेल्या आंदोलनावर मनोज जरांगे-पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

'मी जर मनात आणलं असतं. मी येड्या दिमागाचा असतो तर म्हणालो असतो यांना धाराशिवच्या बाहेर जाऊ देऊ नका', या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूरमधील आपल्या रॅलीत सत्ताधाऱ्यासंह विरोधपक्षांवर देखील टीका केली. नारायण राणे हे जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. त्याला उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, माझ्या नादी लागू नका. याच्यानंतर बोलला तर धुलाई करेल.तसेच छगन भुजबळ यांच्या प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना देखील पाडा, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, हे आपल्या मुलांना माहिती नाही. नोकऱ्या महाराष्ट्रात असतात आणि जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सर्व अंदाज येईल. जरांगे-पाटलांनाही सर्व अंदाज येतील. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य आहे. इथल्या मुलांना शिक्षण आणि रोजगार याच्यासारख्या संधी कोठेच उपलब्ध होणार नाहीत. महाराष्ट्रात सर्वकाही आहे.

'तो' आरोप फेटाळला

शरद पवार हे मराठा समाजाचा माथ भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवार मराठ्यांचे माथे भडकवितात का नाही मला माहीत नाही. कोणाच्या ऐकण्यातला हा समाज नाही. आम्ही आरक्षण घेऊनच राहणार. यांना दंगल घडवायची आम्ही ते होऊ देणार नाही, अशा शब्दात राज ठाकरेंना सुनावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT