Maratha Reservation Protest  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation Protest : ...तर सरकारविरोधात 'काळी दिवाळी' साजरी करू; मराठा आंदोलकांचा इशारा!

Chetan Zadpe

Ahmednagar News : मराठा समाज आरक्षणासाठी सरकारला आव्हान देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यातील मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले गेले नाही, तर आम्ही दिवाळी सण साजरा करणार नाही. काळी दिवाळी साजरी करू. सरकारचा निषेध करू, असा इशारा राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील सकल मराठा समाजाने दिला आला आहे. (Latest Marathi News)

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे सकल मराठा समाज बांधवांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व मागणीच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू केले आहे. मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत, या मागणीकरिता साखळी उपोषण सुरू केले आहे. साखळी उपोषणात नवनाथ नळे, अनिल पठारे, सागर लोंढे, दिलीप गोरडे, सागर गोर्डे, हेमंत गोरडे, सचिन नळे, सनी चोळके, रवींद्र नळे आदी सहभागी झाले आहेत.

दशरथ गव्हाणे म्हणाले, "राज्य सरकारने मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन टिकाऊ स्वरूपाचे आरक्षण दिले पाहिजे. त्याकरिता सर्व खासदार व आमदारांनी मिळून राज्य व केंद्र सरकारच एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलून त्यात आरक्षणास मान्यता द्यावी. आजपर्यंत अनेक आश्वासने आरक्षणाच्या बाबतीत दिली. परंतु आश्वासनांची पूर्ती झाली नाही."

"मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी मान्य कराव्यात, आरक्षण दिले गेले नाही तर सकल मराठा समाज येणारा दिवाळी सण साजरा करणार नाही. अस्तगावात फटाके वाजविणार नाही. उत्सवही केला जाणार नाही," असा ठराव केला असल्याचे दशरथ गव्हाणे यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT