Eknath Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : लाडक्या बहिणीचे पैसे बँक काढून घेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला इशारा, म्हणाले...

Eknath Shinde mazi ladki bahin yojana Bank : बहि‍णींचे पैसे कापून घ्याल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते करेक्ट कार्यक्रम करतील. महिलांना त्यांच्या स्वप्न आणि संसारसाठी पैसे दिले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Roshan More

Eknath Shinde News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारकडून महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, थकबाकी, तसेच बँक चार्जच्या नावाखाली महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे बँक कापून घेत असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरून बँकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे.

कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'जी बँक महिलांचे पैसे काढून घेईन त्या बँकेवर आम्ही कारवाई करणार.'

बहि‍णींचे पैसे कापून घ्याल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते करेक्ट कार्यक्रम करतील. महिलांना त्यांच्या स्वप्न आणि संसारसाठी पैसे दिले आहेत. तुम्ही पैसे कट कराल तर कारवाई करू,असे मुख्यमंत्री शिंदे बँकांना उद्देशून म्हणाले.

माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधकांची पोटदुखी, पाठदुखी सुरू झाली. त्यांनी खोटा प्रचार केला. योजना बंद व्हावी म्हणून ते कोर्टात गेले. तुम्ही दिले नाही, आम्ही देतोय. ते थांबावण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असा मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावले.

विरोधकांनी कितीही विरोधात प्रचार करू द्या महिलांचा सरकारवर विश्वास आहे. दीड कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. योजनेला विरोध करणाऱ्यांनी योजना सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या फोटो विना श्रेय घेण्यासाठी बॅनर लावले . योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा दाखवा, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

'त्या' नराधमाला सोडणार नाही

बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी राज्यसरकार करेल. जो नराधम माझ्या बहिणीला हात घालेल त्याला सोडणार नाही. पण विरोधकांनी त्याचे राजकारण केले. विरोधकांनी राजकारण करताना खोटं बोला पण रेटून बोला हे राजकारण बंद करावे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT