Satara, 31 October : माण तालुक्यातील बोराटवाडी येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरावधारक मतदारांचा मेळावा झाला. हा मेळावा मतदानाचे आवाहन करण्यापेक्षा एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्या व राजकीय चिमट्यांनी गाजला.
मेळाव्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, आमदार धैर्यशील कदम, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्यासह सर्व ठरावधारक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी १० वर्षे अटीमुळे आम्हाला बँकेतून बाहेर काढलंय, तसं जिल्ह्यातून बाहेर काढू नका, अशी कोपरखळी मारतानाच ठरावधारक मतदारांच्या हातावर पाणी घालतो; म्हणजे ते खुश होतात अशी कबुलीही दिली.
जिल्हा परिषदेत झालेला संघर्ष टाळून आपल्याला एकत्रितपणे पुढे जायचं आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढे जात आहोत, असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.
मंत्री जयकुमार गोरे यांनीही बँकेत राजकारणाचे जोडे नसावेत; परंतू बँकेतून राजकीय व्यूहरचना होऊ नयेत. कारण माझ्यावर झालेल्या बहुतेक व्यूहरचना बँकेत बसून झालेल्या आहेत, असा गुगली टाकत ‘आम्ही शब्दांचे पक्के आहोत, फक्त राष्ट्रवादीकडून काही कला होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी माणच्या निवडणुकीत जयकुमार गोरे हे कसे निवडून येतील, अशीच व्यूहरचना रामराजे नाईक निंबाळकर करतात. त्यामुळे तुम्ही दोघं नाटक करुन आम्हाला फसवताय की काय, ही मोठी शंका आहे, असा बाँब टाकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.