Rajaram Sugar Factory Election Result Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : सभासदांनी टोचले नेत्यांचे कान; आरोप-प्रत्यारोपांना कंटाळले : मत पेटीत निघाल्या अनेक चिठ्ठ्या

Sugar Factory Election Result : कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Rajaram Sugar Factory Election Result : कोल्हापुरातील (Kolhapur) श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये महाडिक गटाने आघाडी घेतली. मात्र, या चार फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीमध्ये सभासदांनी मत देताना सोबत चिठ्ठीही दिली आहे. यामध्ये नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. सभासदांनी चिठ्ठ्यांमधून व्यक्त केलेला राग शेलक्या भाषेत आहे. (Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result News)

एका चिठ्ठीत म्हटले आहे "निष्ठा प्रामाणिकपणाला मारले फाट्यावर, मतदान होते आहे नोटांच्या गठ्यावर, कोणी 10 कोणी 5 किती वाटले नाही मोजदाद. मा. महाडिकसाहेब, मा. बंटी पाटील साहेब टोकाच्या ईर्ष्येपायी कसला नि कुठला पायंडा पाडला जात आहे. याचा यापुढे तरी विचार करा. सभासदांना मताचे मोल घेत असताना होत आहेत गुदगुल्या, कामासाठी नेत्यांपुढे जाताना काढाव्या लागतील नाकदुऱ्या.'' असा शब्दांत राजकीय नेत्यांना फटकारले आहे.

महाडिक साहेब कारखाना व्यवस्थित चालू आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची लग्न होत नाही. त्यांच्या ऑर्डर तेवढ्या काढा रिटायरमेंटला आली तरी ती परमनंट झालेली नाहीत. बंटी पाटील साहेब तुम्ही सर्जेराव माने यांचे ऐकून नको ती टीका करु नका. तो माणूस तुमचा पण विश्वासघात करेल. तुम्ही जर कारखान्याला सहकार्य केले तर कारखाना आणखी चांगला चालेल.

श्री छत्रपती साखर कारखाना आज रोजी चालू असलेली निवडणूक व त्यामध्ये प्रतिष्ठा पणाला लावून वारेमाफ खर्च करण्यात येत आहेत. मग हा खर्च कोठून वसूल करणार. सभासदांनी कोणावर विश्वास ठेवावा हा चिंतेचा विषय आहे. आम्हाला एकच अपेक्षा आहे, तुम्हापैकी कोणीही सत्तेत आल्यानंतर इथेनॉल, को-जनरेशन असे विभाग चालू करा, सभासदांना चांगला दर देता येईल, बाकी तुम्हा दोघांचे आरोप-प्रत्यारोप आम्हास मान्य नाही, असेही एका पत्रात म्हटले आहे. असे अनेक पत्र आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT