Abdul Sattar and Farmers Issue : प्रतवारी करून व्यापारी व दलाल शेतक-यांची लूट करू लागले आहेत. जुने आले(आद्रक) व नवीन आले खरेदी करण्याच्या गेल्या दोन वर्षातील निर्णयामुळे शेतक-यांचे नुकसान होवू लागले आहे. त्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवावी. तसेच आले खरेदीत प्रतवारी थांबवण्याची मागणी ही केली होती. त्यावरून पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार समितीसह व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे.
संगनमताने होत असलेली आले उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी व्यापा-यांनी सरसकट आले खरेदी करावी, अन्यथा व्यापारी व बाजार समितीवरती कारवाई करणार असल्याची माहिती पणनमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी राज्यातील आले उत्पादक शेतक-यांच्या बैठकीत दिली. सिल्लोड येथे ही बैठक पार पडली.
स्वभिमानी शेतकरी संघटनेचा(swabhimani shetkari sanghatana) महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील आले उत्पादक शेतकरी व पणन विभागातील अधिकारी यांची सिल्लोड येथील त्यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
सातारा, औरंगाबाद व सांगली जिल्ह्यामध्ये सरसकट आले खरेदीसाठीचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. यंदा आल्याचे दर वाढल्यानंतर आले खरेदीमध्ये जुने आणि नवे आले पद्धत सुरू करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे आले उत्पादक अडचणीत सापडला आहे त्या विरोधामध्ये सातारा सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जुने आणि नवे आले अशी प्रतवारी न करता सरसकट खरेदीसाठी तीव्र आंदोलन उभे केले आहे.
सरकारने याआधीही विधानसभेमध्ये घोषणा केली असून आले प्रतवारी न करता खरेदी करण्यासाठी येत्या चार दिवसात लेखी आदेश पणन विभागामार्फत सर्व बाजार समित्यांना दिल्या जाणार आहेत. त्याबरोबरच अनेक व्यापारी कोणताही परवाना व लायसन्स नसताना माल खरेदी करू लागले आहेत .
सध्या व्यापारी बांधावरची खरेदी करताना जुन्या आल्याला 75 रुपये प्रति किलो करणारे आल्याला 16 रुपये प्रति किलो असा दर देत आहेत. अशा प्रकारच्या दरातल्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमणात असंतोष निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांच्या या फसवणुकीच्या विरोधात पणन विभागांनी संबधित व्यापारी यांच्यावर कडक कारवाई निर्देश राज्याच्या पणन संचालकांना दिले.
सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मोडून काढण्यासाठी व्यापारी मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच आखत आहेत. त्यांच्यावरही लक्ष ठेवून कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या सूचना पणनमंत्र्यांनी दिल्या. पणन मंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे आजपासूनच सरसकट आले खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना परणसंचालकाना आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या दिल्या.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.