<div class="paragraphs"><p>दत्त दर्शनासाठी पायी जाताना केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड</p></div>

दत्त दर्शनासाठी पायी जाताना केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड

 

सुनील गर्जे

पश्चिम महाराष्ट्र

दत्त दर्शनासाठी मंत्री भागवत कराडांची दोन किलोमीटर पायपीट

सुनील गर्जे

नेवासे ( अहमदनगर ) : केंद्रात अर्थराज्यमंत्रीपद मिळूनही साधेपणा जपणाऱ्या डॉ. भागवत कराड ( Dr. Bhagawat Karad ) यांचा साधेपणा शनिवार (ता. 19 ) अहमदनगर जिल्ह्याने अनुभवला. Minister Bhagwat Karad walked two kilometers for Datta Darshan

श्री क्षेत्र देवगड येथे दर्शनाला जाताना दत्तजयंतीमुळे झालेल्या भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्याची वाट न पाहता डॉ. कराड यांनी देवगड ते देवगड संस्थानपर्यत दोन किलोमीटर पायी जात श्रीदत्ताचे दर्शन घेतले.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे काल शनिवारी प्रवरानगर येथे सहकार परिषदेसाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते औरंगाबादला परत जाताना त्यांनी श्री क्षेत्र देवगड येथील दत्तजयंती निमित्त श्रीगुरु दत्ताचे दर्शन घेण्याचे नियोजित दौऱ्यामुळे त्यांचा ताफा देवगडकडे वळला. दत्त जयंतीनिमित्त भाविकांची येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडी होते. कराड यांच्या ताफ्यालाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागवा.

मंत्र्याचा ताफा वाहतूक कोडींत अडकल्याचे पाहून तेथे काम करणारे पोलिसही भांबावले. मात्र कराड यांनी येथेही आपला साधेपणा दाखवला. त्यांनी वाहतुक कोडी कमी होण्याची वाट न पाहता गाडीतून उतरुन देवगड ते देवगड संस्थान अशी दोन किलोमीटर पायपीट करत दत्त संस्थान गाठून भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेतले.

यावेळी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी मंत्री कराड यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी गायक राम विधाते, बजरंग विधाते, औरंगाबाद शहराचे माजी महापौर बापू घडामोडे, मनोज चोपडा, बाळासाहेब पाटील, किरण धुमाळ आदी होते.

लवकरच देवगडला रेल्वेने येईल : मंत्री कराड

गैरसोईबद्दल कुठलीही तक्रार न करता मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने पायी वारी केल्याचा आनंद प्राप्त झाला असे उद्गार डॉ. कराड यांनी याप्रसंगी काढले, आज जरी पायी आलो असलो तरी औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्ग पूर्ण करून लवकरच भगवान दत्तात्रयाच्या दर्शनास रेल्वेने येईल, देवगड संस्थान येथे रेल्वे स्थानक उभारण्यात येईल असेही डॉक्टर कराड याप्रसंगी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT