Shambhuraje Desai, Vikramsinh Patankar
Shambhuraje Desai, Vikramsinh Patankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan : मंत्री देसाईंची पाटणकरांवर टीका; त्यांनी दुर्गम भाग वंचित ठेवला....

सरकारनांमा ब्यूरो

चाफळ : ज्यांना शिवसेनेची ॲलर्जी आहे, तेच अकसापोटी खोक्यांची वल्गना करत आहेत. १९९९ ते २००४ या काळात ज्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद तसेच रस्ते विकास महामंडळाचा पदभार असताना पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील रस्ते व इतर सुविधा त्यांना करता आल्या नाहीत, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकरांचा नामोल्लेख टाळून लगावला.

माजगांव (ता. पाटण) येथे झालेल्या चाफळ भागातील चरेगांव, चाफळ, दाढोली रस्ता ते चाफळ फाटा ते गमेवाडी रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. शंभूराज देसाई म्हणाले, आधी पाटण तालुक्यातील १३० गावे व वाड्या-वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. आज अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत.

२००४ च्या निवडणूकीत निवडून आल्यानंतर मी सभागृहात तालुक्यातील १३० गावांच्या मुलभूत समस्यांबाबत आवाज उठवून निधी मिळवून घेतला. त्यामुळे आज तालुक्यातील गावे सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाली. वीज, पाणी या मूलभूत सोयीही करण्यात आल्या आहेत.

जनतेने देखील विकास पाहून येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देसाई गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्व उमेदवार निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी चाफळ विभागाच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. माथणेवाडीचे सरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांनी देसाई गटात प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT