Procession drawn by Minister Shankarrao Gadakh
Procession drawn by Minister Shankarrao Gadakh Vinayak Darandale
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री गडाखांनी मिटवला दोन मंडळातील वाद... कार्यकर्त्यांनी काढली मिरवणूक

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : नेवासे शहरातील जय भोलेनाथ नवरात्र मंडळ व मध्यमेश्वर युवा प्रतिष्ठाणच्या सदस्यांत अनेक वर्षांपासून तेढ होता. मध्यमेश्वरनगरच्या विकासात हा वाद नेहमी अडवा यायचा. विरोधाला विरोध म्हणून वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा आधार घेतला जात होता. अखेर हा वाद संपविण्यात राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना यश आले आहे. Minister Gadakh erases old controversy: Activists take out procession in enthusiasm

मागील अनेक वर्षांपासून नेवासे येथील नवरात्र उत्सव मंडळात असलेला वाद मंत्री शंकरराव गडाख यांच्या मध्यस्थीतून सुटला. स्नेहभावाचे अपुर्व नातं जोडल्याच्या आनंदात युवकांनी मंत्री गडाख यांना खांद्यावर बसून मिरवणूक काढत व्यक्त केला. मंत्री गडाख यांनी मंडळातील शंकर डुकरे, सुनील धोत्रे, मोहन इरले, संतोष डुकरे, पप्पू डुकरे यांचा अक्षय म्हस्के, सुरेश परदेशी, संदीप म्हस्केसह अन्य सदस्यांत एकोपा घडवून आणला.

दोन्ही मंडळासह विवेकानंद मित्र मंडळ व शिवएकता नवरात्र मंडळाने मंत्री गडाखांच्या हस्ते आरती सोहळ्याचे नियोजन केले. स्वागताला एकोप्याचे दर्शन घडल्याने ग्रामस्थांनी या एकजुटीचे जोरदार स्वागत केले. मंडळातील सदस्यांनी त्यांना खांद्यावर घेवून मिरवणूक काढली. या दरम्यान त्यांनी ग्रामस्थ व व्यावसायिकांना भेटून प्रश्न समजून घेतले.शिवाजीनगर परीसराला त्यांनी भेट दिली.

नगर पंचायत चौकात झालेल्या कार्यक्रमात अनेकांनी युवकांच्या मनोमीलन उपक्रमाचे स्वागत केले. शहर विकासासाठी हा महत्वाचा धागा ठरेल असे बोलले जात आहे. मुख्य आरती सोहळ्यास नगराध्यक्षा योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, प्रदीप वाखुरे, 'मुळा'चे संचालक शिवाजी जंगले, नारायण लोखंडे, अॅड. बापुसाहेब गायके उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT