<div class="paragraphs"><p>Hasan Mushrif &amp; Sharad Pawar</p></div>

Hasan Mushrif & Sharad Pawar

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

शरद पवारांनी झोळी फाटेपर्यंत दिले

सुनिल पाटील : सरकारनामा वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात पंधरा वर्षापासून मंत्री म्हणून काम करत आहे. आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi Government) दोन वर्षापासून आहे. त्यामुळे मला कोणी काय दिले असेल, तर ते कागलच्या जनतेने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी झोळी भरून दिले आहे, असा पलटवार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यावर केला. जिल्हा बॅंकेच्या करवीर, गगनबावडा आणि शहरातील ठरावधारकांचा मेळावा महासैनिक दरबार हॉल येथे (ता.29 डिसेंबर) झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, (Satej Patil) आमदार पी.एन.पाटील, (P.N.Patil) आमदार प्रकाश आवाडे, (Prakash Awade) आमदार विनय कोरे, (Vinay Kore) आमदार जयंतराव आसगावकर (Jayantrao Asgaonkar) आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेहमी कौतुक करत आलो आहे. 2014 ला विधानसभा निवडणूक झाली. यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अपेक्षीत आमदार विजयी झाले नाही. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार हे स्पष्ट होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उध्दव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे युती तुटल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकार्याने ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मी दोन वर्षापासून मंत्री म्हणून काम करत आहे. त्यामुळे जे झोळी फाटेपर्यंत कोणी दिले तर ते कागलच्या जनतेने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले आहे. आता आम्हा कशाची फारशी अपेक्षा राहिलेली नाही, असे मुश्रीफांनी यावेळी स्पष्ट केले.

दुसरीकडे जिल्हा बॅंकेत मुश्रीफ निर्णय घ्यायला कचरले, असे बोलले जात आहे. तर हे खर आहे. जिल्हा बॅंक शेतकऱ्यांची बॅंक आहे. नऊ वर्ष प्रशासकीय कारकिर्दीत लोकांचे खूप हाल झाले. आमच्या पॅनेल मोठी झाली. भाषण झाली. बॅंकेची बदनामी झाली. फार मोठा परिणाम बॅंकेच्या कारभारावर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यायला कचरलो, असे ते मुश्रीफ म्हणाले. लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही बॅंक बिनविरोध करण्यावर भर देत राहिलो. राजकीय पादत्राणे बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आम्ही मंडलिकांचा सल्ला मानला

कागलचा शाहू कारखाना आणि जिल्हा बॅंक बिनविरोध कशी होते, असा एका नेत्याने सवाल केला होता. खासदार संजय मंडलिक यांनीच या दोन्ही निवडणुका बिनविरोध केल्या, त्यांचा सल्ला आम्ही मानला असून निवडणुका बिनविरोध करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचेही मुश्रीफांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT