सातारा : पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंची शिवरायांशी तुलना केल्यानंतर आता मंत्री लोढा यांच्यावर शिवप्रेमींकडून टीकेची झाोड उठली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. अक्कल शून्य असलेल्या लोढा यांनी शेवटी इतिहासाबद्दल आपले अज्ञान दाखवलेच. त्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आमदार शिंदेंनी व्यक्त केली.
प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाषणात पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही श्री.लोढा यांच्यावर तोफ डागली.
शशिकांत शिंदे म्हणाले, शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे बाहेर पडले असं वक्तव्य श्री. लोढा यांनी केले. अक्कल शून्य असलेल्या लोढा यांनी शेवटी इतिहासाबद्दल आपले अज्ञान दाखवले. त्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करणे गरजेचे आहे. आता तरी शिवप्रेमींनी उठा, जागे व्हा, एकीने विरोध करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.