Amit Shah  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amit Shah : कोल्हापुरात यंत्रणा 'टाईट'! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, करवीरनगरीला छावणीचे स्वरूप

Kolhapur security tightened for Amit Shah visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 2 हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Rahul Gadkar

केंद्रीय मंत्री अमित शाह रात्री उशिरा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. . रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी ते कोल्हापूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस महानिरीक्षक यांनी त्यांचे स्वागत केले. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून रात्री दोन नंतर कोल्हापूरच्या रस्त्यांवर तब्बल दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिस कवायत मैदान, शासकीय विश्रामगृह, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, इचलकरंजी कार्यक्रमस्थळ अशा सर्वच ठिकाणी पोलिसांची नेमणूक केल्याने सर्वच ठिकाणी पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. स्थानिक पोलिसांसीकाय केंद्रीय सुरक्षा पथकांनीही तपासणी करून आढावा घेतला.

आज शनिवारी (ता. २०) सकाळी दहा वाजता करवीर निवासिनी अंबाबाईने दर्शन घेणार आहेत. तिथून पोलिस कवायत मैदानावरील सभास्थळी पोहोचतील, सभा आटोपल्यानंतर इचलकरंजी येथे कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. सभास्थळ, मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृहासह व्याया वाहन ताफा ज्या मार्गावरुन जागार आहे, त्याठिकाणी पोलिस तैनात केले आहेत. आज सायंकाळपासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त लावला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना झेड प्लस सुरक्षा असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचतीच्या आदेशाचे पालन करत ताफ्यामध्ये केवळ सातच चाहने ठेवली जाणार आहेत, तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचाही ताफा कमीत कमी वाहनांचा राहणार आहे. झेड प्लस सुरक्षेसह केंद्रीय मंत्र्यांच्या वाहन ताफ्यात यापूर्वी पंधरा ते अठरा वाहनांचा समावेश असायचा, परंतु, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनीच व्हीआयपी दौऱ्यातील वाहने कमी करण्याचे आदेश दिले होते. याची अंमलबजावणी मंत्री शाह यांच्या दौऱ्यात केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT