Mohan Satpute, Shambhuraj Desai Dhebewadi Reporter
पश्चिम महाराष्ट्र

गृहराज्यमंत्री देसाईंची सतर्कता : बेपत्ता आजोबांची नातेवाईकांशी झाली भेट...

जनतेच्या अडीअडचणी व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी २४ तास अलर्ट 24 hour Alert राहून सुखदुःखाच्या प्रसंगात मदतीसाठी धावून येणारा लोकप्रतिनिधी म्हणून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj desai यांचा उल्लेख केला जातो.

राजेश पाटील

ढेबेवाडी : गृहसह विविध खात्यांच्या कारभाराचा प्रचंड ताण असतानाही सोशल मीडियावर येणारी माहिती व घडामोडींवर मंत्री शंभूराज देसाई यांचे किती बारीक लक्ष असते याचा अनुभव काल (रविवारी) पुन्हा एकदा जिल्हावासियांनी घेतला. राष्ट्रीय महामार्गावर भरतगांवजवळ थंडीने कुडकुडत असलेल्या एका बेवारस ज्येष्ठ नागरिकासंदर्भात सोशल मीडियावर आलेली पोस्ट पाहताच मंत्री देसाई यांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत संबंधित व्यक्तीचा पत्ता शोधून कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले. ती व्यक्ती घरी पोहोचेपर्यंत सतत फॉलोअपही घेतला.

जनतेच्या अडीअडचणी व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी २४ तास अलर्ट राहून सुखदुःखाच्या प्रसंगात मदतीसाठी धावून येणारा लोकप्रतिनिधी म्हणून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा नेहमीच उल्लेख केला जातो. शिवाय जनतेलाही विविध प्रसंगातून त्याबाबतचा अनुभव येतच असतो. काल (रविवारी) साताऱा तालुक्यातील भरतगावजवळ घडलेल्या एका प्रसंगातून गृहमंत्र्यात लपलेला एक सहदयी माणूस पुन्हा समोर आला.

त्याचं असं झालं... ढेबेवाडीजवळच्या गुढे (ता.पाटण) येथील मोहन रामचंद्र सातपुते (वय ६५) हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. काल भरतगावजवळ ते महामार्गाशेजारी थंडीत कुडकूडत बसलेले आढळून आले. सातारा येथील छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपचे ॲडमिन शैलेश शेडगे, सुरज शेडगे आदींनी त्यांची आपुलकीने चौकशी केल्यावर संबंधित व्यक्ती ढेबेवाडी भागातील असल्याचे समोर आले. त्यांनी त्यांना खायला घालून थांबवून ठेवले व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क होण्यासाठी त्या आजोबांच्या छायाचित्रासह वाटसप ग्रुपवर पोस्ट टाकली. अनेक ग्रुपवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नातेवाईकांचा शोध सुरु झाला.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मोबाईलवरील ही पोस्ट पाहिल्याबरोबर जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधून तातडीने त्या व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या सूचनेनुसार ढेबेवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुढेतील सातपुते कुटुंबियांशी संपर्क साधला. संबंधितांच्या नातेवाईकांनी साताऱ्याला जाऊन मोहन सातपुते यांना ताब्यात घेवून घरी आणले. कामाच्या प्रचंड व्यापातही मंत्री देसाई यांनी एका ज्येष्ठ नागरिकाबाबत दाखवलेली सतर्कता आणि ती व्यक्ती घरी पोहोचेपर्यंत घेतलेला फॉलोअप याची मोठी चर्चा सातारा जिल्ह्यात होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT