prajakt tanpure

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

मंत्री प्राजक्त तनपुरे झाले कोरोना बाधित

मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) काल ( ता. 29 ) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्यात अनुपस्थित होते.

Amit Awari

अहमदनगर : राज्यातील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत नुकतेच झाले. या अधिवेशनात दोन मंत्री, 53 अधिकारी व काही आमदार कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले. यात राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांचाही समावेश आहे. त्यामुळेच ते काल ( ता. 29 ) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्यात अनुपस्थित होते. Minister Prajakt Tanpure became corona affected

प्राजक्त तनपुरे यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून जाहीर केली आहे. मंत्री तनपुरे यांनी म्हटले आहे की, आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत, अशी विनंतीही त्यांनी केलेली आहे.

मंत्री तनपुरे यांच्या या सोशल मीडिया संदेशावर मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, लवकर बरे व्हा! आमच्या सदिच्छा आपल्यासोबत आहे, असे म्हटले आहे. मंत्री तनपुरे हे विधीमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित होते तसेच मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नातही त्यांनी सहकुटुंब हजेरी लावली होती. तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत. या पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनाही कोरोना झाला होता. उपचारानंतर त्यांनी शिर्डी देवस्थानचे कामकाज सुरू केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT