Shambhuraj Desai
Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पाटणच्या जनतेसाठी मंत्री शंभूराज देसाई घेणार 'जनता दरबार'

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सोडविण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (ता.15 फेब्रुवारी) सकाळी साडे अकरा वाजता पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन केले आहे. कोविड संसर्गानंतर पहिलाच 'जनता दरबार' होत आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रथमत: पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर २००४ ते २००९ व 2014 ते 2019 या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या तालुका व जिल्हास्तरावरील असणाऱ्या प्रलंबित समस्या व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबाराची संकल्पना राबविली होती. यामध्ये जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर होत होता.

जनतेचे प्रश्न जागेवरच मार्गी लागत असल्यामुळे समाधानाचे वातावरण होते व जनता दरबारास मतदारसंघातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसादही दिला होता. मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी ही संकल्पना सलग 10 वर्षे अखंडीत राबविली. मात्र, गेल्या दोन वर्षात कोविड 19 च्या संसर्गामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे जनता दरबारचे आयोजन केले नव्हते.

आता मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येत्या मंगळवार (ता. 15) जनता दरबारास जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांना निमंत्रित करण्यात आले आहे. या जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी यांच्यासह पाटण व कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख यांनाही निमंत्रित केले आहे. मतदारसंघातील जनतेने आपल्या समस्यांची लेखी निवेदने घेऊन मोठयासंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT