Silence with the citizens of Minister Shankarrao Gadakh Vinayak Darandale
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री शंकरराव गडाख पारावरच्या गप्पात झाले दंग...

महाराष्ट्र ( Maharashtra ) राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Minister Shankarrao Gadakh ) यांनी विधानसभा निवडणुकीपासून सामान्य जनतेला जास्तीत जास्त वेळ देत आहेत.

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानसभा निवडणुकीपासून सामान्य जनतेला जास्तीत जास्त वेळ देत आहेत. जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याला मंत्री गडाख प्राधान्य देत आहेत. शिवसंपर्क अभियानातून शिवसेनेची ग्रामीण भागातील पक्षाचे संघटन ते वाढवित आहेत.

सोमवार ते शनिवार पर्यंत मुंबईतील कामे आटोपून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख शनिवारी रात्री घरी आले. कुठलाच कार्यक्रम न घेता त्यांनी रविवारी सकाळी मुळाथडी भागाला भेट देवून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. खेडले परमानंद येथील वडाच्या झाडाखाली रंगलेल्या पारावरच्या गप्पात युवकांसह जेष्ठांनीही सहभाग घेतला होता.

खेडले परमानंद येथील मारुती मंदिरासमोर मोठे वडाचे झाड असुन येथे ग्रामपंचायतीने पाराचा ओटा बांधून सुशोभिकरण केलेले आहे. मंत्री गडाख यांनी हीच जागा निवडून येथे भारतीय बैठक मांडली. या गप्पांच्या मैफलीत 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, जेष्ठ कार्यकर्ते सूर्यभान आघाव, लक्ष्मण जाधव, दौलत तुवर, दादासाहेब तुवर, भाऊसाहेब राजळे, अल्लू इनामदार, परमानंद जाधव सहभागी झाले होते.

रंगलेल्या पारावरच्या गप्पात कार्यकर्ते व शेतक-यांनी मांजरी-शिरेगाव व अंमळनेर-वांजुळपोई किटवेअर बंधारा मुळा धरणाच्या पाण्याने भरुन द्यावा अशी मागणी केली.कोरोना परिस्थिती, पाऊसपाणी, मुळा, भंडारदरा धरण स्थिती व उस गळीत हंगाम विषयावर चर्चा झाली. बाळासाहेब तुवर यांनी कोरोना संकटातील अनुभव सांगितला. मंत्री झाल्यानंतर गडाख प्रथमच गावात आल्याने युवकांनी सनई चौघाडा वाद्य व पंचवीस तोफांची सलामी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT