Nagar Panchyat Election News Updates
Nagar Panchyat Election News Updates Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री विश्वजित कदम यांना जबर धक्का; कडेगावमध्ये भाजपची सत्ता

सरकारनामा ब्युरो

कडेगाव : राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचे गाव असलेल्या कडेगावमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे कदम यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) स्वतंत्र पॅनेल टाकल्याने काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्याची चर्चा आहे. भाजपला (BJP) 10 तर काँग्रेसला केवळ सहा जागा मिळाल्या आहेत.

नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस असा तिरंगी सामना झाला. पहिल्या टप्प्यातील १३ प्रभागातील मतदान प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी पार पडली असून उर्वरित चार प्रभागासाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस येथे स्वतंत्र पॅनेल देत रंगत वाढवली होती. काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे तर भाजपा व राष्ट्रवादी सत्ता काबीज करण्याचे आव्हान होते. यामध्ये भाजपने बाजी मारली असून काँग्रेसला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. (Nagar Panchyat Election News Updates)

कर्जतमध्ये रोहित पवारांची सरशी

अहमदनगर कर्जत नगर पंचायतचा समावेश आहे. ही निवडणूक भाजपचे ( BJP ) माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी 12 जागांवर तर भाजपला केवळ दोन जागांवर आघाडी मिळाली आहे.

निवडणुकीत राष्ट्रवादीची एक जागा पूर्वीच बिनविरोध झाली आहे. नगरपंचायतीची ही निवडणूक आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांची राजकीय परीक्षा व सामर्थ्य जोखणारी ठरणार आहे. या निवडणुकीत आजी की माजी... कोण मारतो बाजी, याकडे तालुक्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सध्यातरी रोहित पवार यांनीच बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.

कर्जत नगर पंचायत

राष्ट्रवादी - 12

काँग्रेस - 3

भाजप - 2

-------------

राज्यातील इतर नगर पंचायत निकाल -

जळगाव - बोदवळ नगरपंचायत

एकुण जागा-17

भाजप- 0

शिवसेना-1

काँग्रेस-0

राष्ट्रवादी-2

----------

वैभववाडी

एकुण जागा-17

भाजप-2

शिवसेना-1

काँग्रेस-

राष्ट्रवादी-

इतर(अपक्ष)-1

---------

म्हसळा

पहिल्या पाच फेरीत 5 जागेवर राष्ट्रवादी विजयी

--------------

माढा नगरपंचायत -

प्रभाग सहा - संजीवनी भांगे 204 (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक 7 - अर्चना कानडे (शिवसेना) 222.

प्रभाग आठ - संगीता साठे 307(अपक्ष)

प्रभाग क्रमांक 9 - चंद्रशेखर गोटे ( राष्ट्रवादी )242

प्रभाग दहा - शबाना बागवान. 258 काँग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT