Sangli Politics | Vishal Patil | Miraj Panchayat Samiti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : "शासकीय निधी बापाचा पैसा असल्यासारखं..."; खासदार विशाल पाटील कडाडले; मिरजेतील वादावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Miraj Panchayat Samiti : विशाल पाटील यांच्या वक्तव्यावरून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय त्यांनी हा आरोप नेमका कुणावर केला आणि कुणाला इशारा दिला याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

Jagdish Patil

Sangli News, 12 Jul : सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पंचायत समितीतील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सभापती आणि उपसभापतींना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या उद्घाटनापूर्वीच सत्ताधारी महाविकास आघाडीकडून नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं आहे.

शिवाय या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला करत सत्ता बदलानंतर मिरज तालुक्यातील सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करणार असा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?

सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना खासदार पाटील म्हणाले, "सत्तांतरानंतर सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करणार. शासनाच्या लोकांना एक सवय लागली आहे.

त्यांना वाटतं की, शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही तर आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा आणि आपल्याच बापाचा आहे, अशीच त्यांची धारणा झाली आहे. पण त्यांची कुणाची कितीही इस्टेट असो, हे पैसे त्यांच्या मालमत्तेतून निर्माण झालेले नाहीत तर ते जनतेच्या पैशातून निर्माण झालेले पैसे आहेत, अशा शब्दात विशाल पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावरून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय त्यांनी हा आरोप नेमका कुणावर केला आणि कुणाला इशारा दिला याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT