Anil Babar, Gopichand Padalkar
Anil Babar, Gopichand Padalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमचीच मदत घेऊन आमच्यावरच उलटणाऱ्यांना योग्य वेळी जागा दाखवू! पडळकरांचा बाबरांना इशारा

सरकारनामा ब्यूरो

विटा : कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांच्या सत्कार कार्यक्रमात दोन आमदारांमध्येच शाब्दिक चकमक झाली. खानापूर विधानसभा मतदारसंघात अनेक अडचणी आणल्या जात आहेत. आमचीच मदत घेऊन आमच्यावर उलटणाऱ्यांना योग्य वेळी नक्की जागा दाखवून देईन, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता, आमदार अनिल बाबर यांना दिला.

दरम्यान, आमदार अनिल बाबर यांनी मात्र, संयमी भाषेत उत्तर दिले. हा पालकमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे. कधी, कुठल्या ठिकाणी, काय बोलायचे, याचे संस्कार आणि भान मला आहे, असे असे त्यांनी ठणकावले.

पंचफुला कार्यालयात भाजप (BJP) विटा शहर व खानापूर तालुका यांच्यावतीने पालकमंत्री झाल्याबद्दल खाडे यांचा सत्कार करण्यात आला, या वेळी भाजपचे विटा शहराध्यक्ष अनिल म. बाबर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंबे, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मनन कन्स्ट्रक्शनचे सागर वडगावे व भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल सागर वनखंडे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी पडळकर शहराध्यक्ष अनिल म. बाबर यांचे कौतुक करत म्हणाले, तुम्ही आता कोणाच्या तरी वळचणीला जाऊ नका. या गावाचे नेतृत्व तुम्ही करा. आपण ताकदीने मदत करु. सत्कारा उत्तर देताना खाडे म्हणाले, कामगारांचे सुख-दुःख वाटण्याचा प्रयत्न करणार. माझ्या सत्कारापेक्षा पक्षाचा आढावा आणि आराखडा महत्त्वाचा होता. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून परिसरातील विकासाला चालना देईन. आम्ही राज्यात एकजीवाने काम करत आहोत. यापुढेही सर्वच निवडणुकांत एकत्रित काम करु, भाजप हा अन्य पक्षांप्रमाणे कुणाच्या मालकीचा पक्ष नाही.

भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, राजाराम गरूड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी नगरसेवक अमोल बाबर, विटा बँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, उपाध्यक्ष उत्तम चोथे आदी उपस्थित होते. भाजपच्या वतीने काही कामगारांना ई-श्रम कार्डचे वितरण खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, भाजप अल्पसंख्याक समाज विटा शहराध्यक्षपदी साजीद शिकलगार यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. सोहम जाधव, जगन्नाथ पाटील, श्रीधर जाधव, पंकज दबडे, विक्रम भिंगारदेवे, संतोष यादव, अमर शितोळे, सुधीर बाबर, धीरज पाटील यांनी संयोजनासाठी योगदान दिले. कुमार लोटके यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT