MLA Babanrao Shinde -Devendra Fadnavis
MLA Babanrao Shinde -Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार बबनराव शिंदेंनी पंढरपुरात पुन्हा घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

सरकारनामा ब्यूरो

शिवाजी भोसले

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची दिल्लीत जाऊन घेतलेली भेट, त्यानंतर उठलेलं भाजप प्रवेशाचे वादळ. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना कुर्डूवाडीत निमंत्रित करून त्यावर पडदा टाकण्याचा केलेला प्रयत्न. पण, कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले फडणवीस यांच्या सोबतची सलगी...त्यामुळे भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, ती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार आणि साखर कारखानदारीमधील बडं प्रस्थ बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांची. (MLA Babanrao Shinde meet Devendra Fadnavis again in Pandharpur)

पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आमदार बबनराव शिंदे यांनी शुक्रवारी (ता. ४ नोव्हेंबर) फडणवीस यांची पंढरपुरात भेट घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बबनराव शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आमदार शिंदे यांनी त्याचा इन्कार केला आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राजन पाटील हे वारंवार भाजपमध्ये जाण्याचे संकेत देत आहेत. असे असतानाच आता बबनराव शिंदे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.

आमदार शिंदे यांच्या हालचाली पाहून विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. शिंदे यांनी भाजपमध्ये जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा प्रयत्न होता. मात्र, बबनराव शिंदे यांनी पंढरपूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पुन्हा भेट घेतल्याने त्यांच्या मनात नेमके आहे तरी काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह आणि पंतनगर येथील आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरीही बबनराव शिंदे उपस्थित होते. ते कोणत्या कारणांसाठी फडणवीसांना भेटले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी त्यांच्या भेटीने सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT