MLA Chandrakant Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शोककळा

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार व यशस्वी उद्योगपती चंद्रकांत पंडित जाधव (Mla Chandrakant Jadhav) यांचे हैदराबाद येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरात आणले जाईल.

2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. मनमिळावू व कार्यतत्पर अशी ओळख असणाऱ्या श्री जाधव यांच्या मृत्यूने उद्योगासह राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या दीड वर्षापासून त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT