Dr. Babasaheb Deshmukh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Babasaheb Deshmukh : ‘दादांनो, मी भोळा दिसत असेल...पण तसा नाय, एक-दोघांना माझा दणका माहिती हाय’; संयमी बाबासाहेब देशमुखांचा आक्रमक अंदाज

Ganpatrao Deshmukh's House Attack : सांगोल्यात स्व. गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आक्रमक होत विरोधकांना थेट इशारा दिला.

दत्तात्रय खंडागळे
  1. भाजप प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर बाटली फेकून हल्ला करण्यात आला, त्याच्या निषेधार्थ सांगोल्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

  2. मोर्चादरम्यान शांत आणि संयमी स्वभावाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आक्रमक झाले व विरोधकांना थेट इशारा दिला — “मी लय भोळा दिसत असेल... पण मी तसा नाय.”

  3. त्यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासोबत एकतेचा संदेश देत ‘देशमुख विरुद्ध देशमुख’ चर्चेलाही पूर्णविराम दिला.

Solapur, 11 October : भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकून हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात आज (ता. 11 ऑक्टोबर) सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात एरवी शांत आणि संयमी म्हणून परिचित असलेले आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख अचानक आक्रमक झाले. ‘दादांनो, मी लय भोळा दिसत असेल...पण मी तसा नाय. एक-दोघांना माझा दणका माहिती हाय’ असा खणखणीत इशारा विरोधकांना दिला.

सांगोल्यात (Sangola) आज कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे आपले दुकाने बंद ठेवली होती. मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना संयमी, शांत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा रुद्रावतार पहायला मिळाला. त्यामुळे उपस्थितही काही वेळ अवाक्‌ झाल्याचे दिसून आले.

दादांनो, मी लय भोळा दिसत असेल...पण तसा नाय. दादा (डॉ. अनिकेत देशमुख) आक्रमक हायं, पण मी त्याच्यापेक्षा जास्त आक्रमक हायं. माझ्यावर जबाबदारी असल्याने मी संयम राखतो, नाहीतर एक-दोघांना माझा दणका माहित हायं,” अशा शब्दांत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी (Dr. Babasaheb Deshmukh) थेट प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य केले. आमदाराच्या या आक्रमक स्वभावाला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.

बासाहेबांचं बाळकडू आम्हाला मिळालंय

मोर्चादरम्यान एका वक्त्याने डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांनी एकत्र राहावे, अशी टिपण्णी केल्यावर आमदारांनी ती थेट उचलली. “हे राजकारण आहे. आबासाहेबांचं (स्व. गणपतराव देशमुख) बाळकडू आम्हाला मिळालंय. कुठं एकत्र बसायचं, कुठं दूर राहायचं, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्हा दोघा बंधूंमध्ये केसाएवढंही अंतर नाही. जनतेने समजून घ्यावं, हे राजकारण आहे. आमदार देशमुख यांच्या या विधानाने ‘देशमुख विरुद्ध देशमुख’ अशी चालणाऱ्या चर्चेवरही एका क्षणात पडदा टाकला आहे.

राजकीय तापमानात संयमाचा विस्फोट

(स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दारूची बाटली फेकल्याच्या घटनेने सांगोला परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा निघाला आणि त्याच मंचावर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदा आपली आक्रमक भूमिका उघड केली. दरम्यान, आमदारांच्या आक्रमक भाषणामुळे सांगोल्याचे राजकीय वातावरण पुढील काही काळ तापलेलेच राहण्याची शक्यता दिसून येत आहे.

सांगोल्याच्या राजकारणाला नवी दिशा

सांगोल्यातील जनतेने डॉ. बाबासाहेब देशमुखांना नेहमीच शांत, मृदू आणि लोकाभिमुख म्हणून पाहिले आहे. मात्र, शनिवारीच्या मोर्चात त्यांनी दाखवलेला आक्रमकपणा विरोधकांसाठी इशारा ठरू शकतो. ‘मी संयम राखतोय...पण मी तसा नायं,’ या एका वाक्यात त्यांनी सांगोल्यातील राजकारणाला नवी दिशा दिल्याचे मानले जात आहे.

प्रश्न 1 : सांगोल्यात मोर्चा का काढण्यात आला?
गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढला गेला.

प्रश्न 2 : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी काय इशारा दिला?
“मी लय भोळा दिसत असेल... पण मी तसा नाय; एक-दोघांना माझा दणका माहिती हाय,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

प्रश्न 3 : देशमुख बंधूंबाबत काय वक्तव्य झाले?
बाबासाहेब देशमुख म्हणाले, “आबासाहेबांचं बाळकडू आम्हाला मिळालंय; आमच्यात केसाएवढंही अंतर नाही.”

प्रश्न 4 : या भाषणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
आमदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे सांगोल्याचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT