Jayant Asgaonkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Asgaonkar : शिक्षण विभागाला शिक्षक आमदारच वैतागले; जयंत आसगावकरांचा आंदोलनाचा इशारा

Ganesh Thombare

Kolhapur News: पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शालार्थ आयडीच्या प्रश्नावर 30 ऑक्टोबरपासून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील आयडीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शिक्षकांना शालार्थ आयडी मिळायला नको म्हणून अधिकारी जाणूनबुजून दिरंगाई करत आहेत, असा आरोप आमदार जयंत पाटील-आसगावकर यांनी केला आहे. तसेच याबाबत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या निष्काळजीपणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या आंदोलन काळात होणाऱ्या गंभीर परिणामाला आपण जबाबदार राहाल, या आशयाचे निवेदन आमदार आसगावकर यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे आता आमदार आसगावकर यांच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेत, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'टप्पा अनुदानावरील शिक्षकांना लवकरात लवकर शालार्थ आयडी मिळवून त्यांची यंदाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. पण, शिक्षण विभागातील अधिकारी याबाबत सकारात्मक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिकाऱ्यांच्याकडून यासंदर्भात चालढकल होत आहे.

शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या 13 जूनच्या आढावा बैठकीत प्रलंबित शालार्थ आयडीचे प्रकरणे तीन आठवड्यांत निकाली काढण्याचे ठरले होते. मात्र, शालार्थ आयडी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे आमदार आसगावकर यांनी सांगितले आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT