Mahesh Landge
Mahesh Landge  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मातृशोकानंतर आमदार लांडगेंचे मोदी, शहांकडूनही सांत्वन

सरकारनामा ब्युरो

Mahesh Landge : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे ( Mahesh Landge ) यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे ( वय ६५ वर्षे,रा.भोसरी) यांचे गेल्या महिन्यात २४ तारखेला अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी (ता.३) त्यांचा दशक्रियाविधी झाला. त्याला राज्यभरातून सर्वपक्षीय नेत्यांसह मोठी उपस्थिती होती.

गेले दहा दिवस भोसरीतील आमदार लांडगेंच्या निवासस्थानी त्यांच्या सांत्वनासाठी राज्यभरातून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग दिसून आली आहे. पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनीही आ.लांडगे व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले‌. स्व.हिराबाई या लांडगे कुटुंबाचा एक मजबूत आधार, प्रेरणास्त्रोत होत्या. त्या आता शरीराने नसल्या, तरी त्यांचे संस्कार आणि जीवनमूल्ये ही त्यांच्या कुटुंबासमवेत कायम राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सांत्वनपर शोकसंदेशात म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शोकसंदेश पाठवून आमदार लांडगेंच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे. आतापर्यंत राज्यभरातून राजकीयच नाही,तर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह अबालवृद्धांनी आमदार लांडगे कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यातून आमदार लांडगे व बंधूंनी कमावलेली माणसांची श्रीमंती, स्व. हिराबाई यांनी जपलेली नाती-गोती,त्यांची गावकी-भावकी व गोतावळा यांचा प्रत्यय आला. एव्हढा प्रचंड लोकसमुदाय जोडणे आणि टिकवणे निश्चितच सोपे नाही,हे ही दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT