सातारा : सातारा (Satara) येथील मेडिकल कॉलेजच्या जागेवरील भंगार चोरीची चौकशी करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते रमेश उबाळे यांच्या आंदोलनास आज (ता. २३ डिसेंबर) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. त्याचवेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदेही (Mahesh Shinde) तेथे आले व त्यांनीही उबाळे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. दोन्ही आमदारांना एकाच आंदोलनात पाहून उपस्थितांच्या मात्र भूवया उंचावल्या. दोघांनीही भंगार चोरीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. (MLA Mahesh Shinde attended the protest site of the NCP leader)
मेडिकल कॉलेजच्या नियोजित जागेतील जुन्या इमारती पाडण्यात आल्या आहेत, त्यातील भंगाराची चोरी झाली असून याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी राष्ट्रवादीचे नेते रमेश उबाळे हे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. आज या आंदोलन स्थळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भेट दिली आणि उबाळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच, हा प्रश्न आम्ही अधिवेशनात मांडू, असे सांगून याला जबाबदार असलेल्या अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.
याच वेळी आंदोलन स्थळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे दाखल झाले व त्यांनीही उबाळे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच, उबाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर भूमिका मांडताना आमदार महेश शिंदे म्हणाले की, रमेश उबाळे हे आमचे मित्र असून त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. नेमकी भंगार विक्री नियमानुसार झाली आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
आमदार म्हणून आमची दोघांची भूमिका तीच आहे.आमचे पक्ष आणि भूमिका वेगळ्या असल्या तरी विकासाच्या कामात आम्ही राजकारण करणार नाही. याची चौकशी झाली पाहिजे. कोरेगावच्या विकास कामाच्या संदर्भात आमची दोघांची भूमिका एकच असेल, त्यामध्ये राजकारण येणार नाही. दरम्यान, दोन्ही आमदारांची भूमिका एकच आहे. नियमानुसार हे भंगार विकले आहे का, हे महत्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.