Eknath Shinde, Mahesh Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon News : न्यायालयाचा निकाल जाहीर होताना आमदार महेश शिंदे भूमिपूजनात व्यस्त होते...

Mahesh Shinde आमदार महेश शिंदे हे निकालाचे टेन्शन न घेता आज आपल्या मतदारसंघातील जनतेत जाऊन विकासकामांचे भूमिपूजन करत होते.

Umesh Bambare-Patil

Mahesh shinde news : सत्ता संघर्षाच्या निकालाची धास्ती आम्हांला नाही. निकाल आमच्याच बाजुनं मात्र आमच्या विरोधात बारामतीचे पिंगळे कंदील घेवुन फिरताहेत, अशी टीका आमदार महेश शिंदेंनी केली. एकीकडे सगळ मंत्रिमंडळ टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी मात्र, जनतेमध्ये जाऊन नवीन विकास कामांच्या भूमिपूजन करण्याचा सपाटा लावला होता.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. राज्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची तलावर हाोती. यापैकी एक आमदार असलेले कोरेगाव Koregaon विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे Mahesh Shinde हे निकालाचे टेन्शन न घेता आज आपल्या मतदारसंघातील जनतेत जाऊन विकासकामांचे भूमिपूजन करत होते.

आमदार महेश शिंदे म्हणाले, सत्ता संघर्षाचा निकाल असला तरी आम्ही जनतेतील लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही जनतेत राहणार. आम्हांला निकालाची धास्ती नाही. आम्ही जनतेच्या विश्वासास पात्र ठरलो असुन निकाल आमच्याच बाजुने होईल, असं सांगत शिंदे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

ते म्हणाले, बारामतीचे पिंगळे आमच्या विरोधात कंदील घेवुन भविष्य वर्तवत फिरताहेत, मात्र जनता आमच्या पाठिशी आहे. अजित पवारांना माहित आहे पक्षात थांबुन उपयोग नाही. बाहेर पडावं लागेल यामुळं विरोधी पक्ष टिकणार नाही. यामुळंच ते आता नाॅट रिचेबल असतील, असा दावा आमदार महेश शिंदे यांनी‌ केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT