Mahabaleshwar News : महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहिमेत स्थानिकांना त्रास होऊ लागल्याने राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी भेट घेतली. गावठाण वाढीचा प्रश्न तालुक्यात भेडसावत असून, त्यावर तोडगाही निघत नाही, त्यामुळे आपण लक्ष घालावे, असे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस शहानिशा करूनच अतिक्रमण विरोधात मोहीम राबवा. स्थानिकांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम उघडली असून, याबाबत आज आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी दरे गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रश्नांबाबत चर्चा केली.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यात अशा प्रकारच्या कारवायांना स्थानिकांनाच सामोरे जावे लागत आहे. गावठाणवाढीचा प्रश्न तालुक्यात भेडसावत आहे आणि त्यावर तोडगाही निघत नाही, त्यामुळे आपण लक्ष घालावे.
या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेही असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी लागलीच त्यांना याबाबतचे आदेश दिले. ठोस शहानिशा करावी व नंतरच मोहीम राबवावी. कारवाईत स्थानिकांना कसलाही त्रास होता कामा नये, याची काळजी घ्यावी, असे सांगितले.
याबरोबरच वन विभागाच्या प्रश्नांबाबत बोलताना मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावात रस्ते, पाणी योजना यांना वन विभागाचा मोठा अडसर निर्माण होत आहे. वन विभागाने आता स्थानिक शेतकऱ्यांच्याही जमिनींवर झोन टाकून अडचणी निर्माण केल्या आहेत.
तसेच वन्य प्राणी धुडगूस घालून शेती नष्ट करीत आहेत, त्यामुळे शेतकरी आतबट्ट्यात येत आहे. या गोष्टी त्यांचे निदर्शनास आणून दिल्या. यावरही विशेष बैठक घेऊन आपण निर्णय घेऊ, असा शब्द शिंदे यांनी आमदार पाटील यांना दिला. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, प्रवीणशेठ भिलारे उपस्थित होते.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.